सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार राजापूर तालुक्यातील ओणी-पाचल-अणुस्कुरा राज्य मार्गाच्या दुरुस्तीसाठी ७ कोटी ४४ लाख रुपयांची मंजुरी
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार राजापूर तालुक्यातील ओणी-पाचल-अणुस्कुरा राज्य मार्गाच्या दुरुस्तीसाठी ७ कोटी ४४ लाख रुपयांची मंजुरी
रत्नागिरी प्रतिनिधी:-
राजापूर तालुक्यातील ओणी-पाचल-अणुस्कुरा या राज्य मार्गाच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ७ कोटी ४४ लाख रुपयांची मंजुरी दिल्याची माहिती विधान परिषदेच्या माजी आमदार व कॉंग्रेस नेत्या अॅड. हुस्नबानू खलिफे यांनी दिली. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबा घाटात दरड कोसळल्याने हा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे पाचलमार्गे अणुस्कुरा घाटातून वाहतूक वाढली. त्यामुळे सध्या ओणी-पाचल-अणुस्कुरा दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वाहनचालकांना वाहने चालवताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अवजड वाहतुकीचे प्रमाण पाहता फक्त खड्डे भरून रस्त्याची दुरूस्ती होणे कठीण बनले आहे. त्यामुळे विशेष रस्ता दुरुस्ती अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार व कॉंग्रेस नेत्या अॅड. हुस्नबान खलिफे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे करून बांधकाम विभागाने तयार केलेला प्रस्तावही सादर केल होता. या पार्श्वभूमीवर अॅड.खलिफे यांनी नुकतीच बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितली. त्यामुळे या रस्त्यासाठी विशेष रस्ता दुरुस्ती अंतर्गत ७ कोटी ४४ लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिल्याचे खलिफे यांनी सांगितले. त्यामुळे ओणी-पाचल-अणुस्कुर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच खलिफे यांच्या प्रयत्नाने नाटे, आंबोळगड येथील समुद्रकिना-यावर धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांनाही ना. अशोक चव्हाण यांनी मंजुरी दिल्याचे अॅड.हुस्नबानू खलिफे यांनी सांगितले.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


Comments
Post a Comment