सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या धावपट्टीवर अचानक आलेल्या कोल्ह्यामुळे यंत्रणेचीही तारंबळ उडाली.,दहा मिनिटांसाठी लॅन्डिंग रखडलं
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या धावपट्टीवर अचानक आलेल्या कोल्ह्यामुळे यंत्रणेचीही तारंबळ उडाली.,दहा मिनिटांसाठी लॅन्डिंग रखडलं
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या धावपट्टीवर अचानक आलेल्या कोल्ह्यामुळे यंत्रणेचीही तारंबळ उडाल्याची घटना नुकतीच घडली
या घटनेमुळं नव्यानं सुरु करण्यात आलेल्या या विमानतळावर दहा मिनिटांसाठी लॅन्डिंग रखडलं होतं. मुंबईवरून आलेल्या विमानाला धावपट्टीवर उतरण्यासाठी दहा मिनिटे अवकाशात घिरट्या घालण्याची वेळ आली.
सिंधुदुर्ग विमानतळ सुरु झाल्यानंतर या विमानतळावर असा एक प्रसंग आला की, मुंबईवरून आलेल्या विमानाला धावपट्टीवर उतरण्यासाठी दहा मिनिटे अवकाशात घिरट्या घालण्याची वेळ आली. त्याचं असं झालं धावपट्टीवर कोल्हा आला होता. हा कोल्हा धावपट्टीवर असल्याचे विमानाच्या पायलटला समजले. त्यांनी तात्काळ विमान पुन्हा आकाशात झेपावले आणि संबंधित यंत्रणेला या कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढण्यास सांगितले. या कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढल्यानंतर दहा मिनिटांनी विमान धावपट्टीवर उतरविण्यात आले. यामुळे प्रवाशांमध्ये सुरुवातील भिती निर्माण झाली होती. तसेच यावरुन विविध चर्चा रंगल्याचंही पाहायला मिळालं.
चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळाच्या आजूबाजूला कोल्ह्यांचा कळप आहे आणि हे कोल्हे आपल्या भक्षकासाठी फिरत असतात. दरम्यान विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर या विमानतळावर पहिल्यांदाच कोल्ह्याचे दर्शन झाले. विमानसेवा सुरु झाल्यानंतर काही दिवसांनी या धावपट्टीवर कोल्ह्यांचा वावर दिसला. मुंबईवरून सिंधुदुर्ग विमानतळावर उतरणाऱ्या विमानाच्या पायलटला धावपट्टीवर प्राणी असल्याचे निदर्शनास आले. हे विमान धावपट्टीवर न उतरता पायलटने पुन्हा विमान आकाशात झेपावले आणि संबंधित यंत्रणेला धावपट्टीवर कोणता तरी प्राणी असल्याचे सांगितले तात्काळ सुरक्षा यंत्रणेकडून धावपट्टीवर पाहणी केली असता त्यांच्या निदर्शनास कोल्हा असल्याचे दिसून आले. या सुरक्षा यंत्रणेने कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढले. त्यानंतर दहा मिनिटांनी या धावपट्टीवर हे विमान उतरविण्यात आले.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा