पुढील चार दिवस मुसळधारांचे




पुढील चार दिवस मुसळधारांचे

 राज्यात पुढील चार दिवस पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने सोमवारी दिला. मोसमी पाऊस या आठवड्यात राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

   राज्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मंगळवारी (५ ऑक्टोबर) रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर, नाशिक, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना मुसळधारांचा पिवळा इशारा देण्यात आला आहे.

 ६ ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि पुणे, तर ७ ऑक्टोबरला रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पिवळा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

सोमवारी महाबळेश्वर येथे सहा मिलिमीटर, साताऱ्यात ११ मि.मी., तर पुण्यात सायंकाळनंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. परभणीत १५ मि.मी., तर अमरावतीमध्ये १८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

सोमवारी  सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरीत ३५.३ अंश सेल्सिअस, तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे १७.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले.

मुंबईच्या उकाड्यात वाढ

’पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईतील उकाड्यात

वाढ झाली आहे. सोमवारी सांताक्रुझ येथे कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ अंशांनी वाढ झाली.

’कुलाबा येथेही किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ अंशांनी वाढ झाली होती.  सोमवारी मुंबईच्या हवेतील आद्र्रता ८० टक्क्यांहून अधिक होती.

’कुलाबा येथे कमाल ३२.६ अंश सेल्सिअस आणि किमान २७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच सांताक्रुझ येथे कमाल ३४.५ अंश सेल्सिअस आणि किमान २६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या