रत्नागिरी जिल्ह्यात जलजिवन मिशन कार्यक्रमांतर्गत शंभर टक्के शाळा व अंगणवाडी यांना नळजोडणीद्वारे पेयजल सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या पंचायत समित्यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने गौरव




 रत्नागिरी जिल्ह्यात जलजिवन मिशन कार्यक्रमांतर्गत शंभर टक्के शाळा व अंगणवाडी यांना नळजोडणीद्वारे पेयजल सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या पंचायत समित्यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने गौरव


रत्नागिरी प्रतिनिधी:-

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत १०० टक्के शाळा व अंगणवाडी यांना नळ जोडणीद्वारे पेयजल सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समितींना प्रमाणपत्र प्रदान करुन गौरविण्यात आले. केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी जल जीवन मिशन कार्यक्रम जिल्हयामध्ये राबविण्यात येत असून, यामध्ये सर्व शाळा, अंगणवाडी, केंद्र आणि सार्वजनिक संस्था यांना जल जीवन मिशन अंतर्गत शाश्वत पाणी पुरवठा उपलब्ध करुन देण्याचा उद्देश आहे. त्यानुसार जल जिवन मिशन १०० दिवसाच्या मोहीमेअंतर्गत शाळा, अंगणवाडी यांना शाश्वत पाणी पुरवठा उपलब्ध करुन देण्याबाबत दि.३०/०९/२०२१ जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पंचायत समिती गुहागर यांना शाळा व अंगणवाडी, पंचायत समिती संगमेश्वर यांना शाळा, पंचायत समिती लांजा यांना अंगणवाडी, पंचायत समिती रत्नागिरी यांना अंगणवाड्यांना १०० टक्के पेयजल सुविधा उपलब्ध करुन दिल्याबाबत रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड व उपाध्यक्ष व सभापती-बांधकाम व आरोग्य समिती उदय बने यांनी पंचायत समितींचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला. सदर कार्यक्रमावेळी सभापती- महिला व बालकल्याण समिती श्रीम.भारती रामचंद्र सरवणकर, सभापती - शिक्षण व वित्त समिती चंद्रकांत सोमा मणचेकर, सभापती-समाजकल्याण समिती पशुराम मारुती कदम, सभापती- कृषि व पशुसंवर्धन समिती श्रीम.रेश्मा रमेश झगडे, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, जिल्हा परिषद सदस्य, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा.व स्व.) डी.एस.परवडी, तसेच तालुका स्तरावरील सभापती व उपसभापती व गट विकास अधिकारी तसेच जिल्हा स्तरावरील अधिकारी, कर्मचारी व तज्ञ/सल्लागार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार श्रीम.श्रध्दा धनावडे, मुल्यमापन व संनियंत्रण तज्ञ यांनी केले.


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या