रत्नागिरी मारुती मंदिर येथे गटार कामामुळे सुशोभिकरण करण्यात आलेल्या कामाची झालीय दुर्दशा
रत्नागिरी प्रतिनिधी:-
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे छ.शिवाजी महाराज स्टेडीयमनजिक सध्या गटाराचे काम सुरु आहे. मात्र यामुळे त्याच ठिकाणी काही महिन्यांपुर्वीच करण्यात आलेल्या सुशोभिकरण कामाची दुर्दशा झाली आहे. दुकानात येणा-या ग्राहकांना गाड्या कुठे पार्किंग करायच्या असा प्रश्न पडत आहे.
छ.शिवाजी महाराज स्टेडीयम मारुती मंदिर परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले. त्यानंतर स्टेडीयमच्या गाळ्यांची लिलाव प्रक्रिया झाली. त्यानंतर आता ऐन सणासुदीचा काळात याच ठिकाणी गटार कॉंक्रीटिकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. यासंदर्भात भाजपा नगरसेवकांनी नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित केला होता. मात्र सभागृहात या विषयावर थोडक्यातच चर्चा झाली आणि विषयांतर झाले. नगराध्यक्ष म्हणाले पहतो आणि आवश्यक त्या सुचना देतो. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी चिरे, वाळू, सिमेंट आदी सामान टाकण्यात आले आहे. यामुळे लाखो रुपये खर्ची केलेल्या सुशोभिकरण कामाची दुर्दशा झाली आहे. संबंधितांनी याकडे जातिनिशी लक्ष देणे गरजेचे आहे.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा