राजापूर अर्बन बँकेच्या वतीने रविवारी आलेल्या बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित


 

 राजापूर अर्बन बँकेच्या वतीने रविवारी  आलेल्या बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित

बँकेच्या यशस्वी वाटचालीत बँकेचा कर्मचारी हा देखील एक महत्वपूर्ण घटक आहे व बँकेची ओळखही आहे. त्यामुळे बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या वर्तनामुळे वा एखाद्या चुकीमुळे बँकेच्या प्रतिष्ठेला बाधा येणार नाही ना याची खबरदारी घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन राजापूर अर्बन बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष अॅड.शशिकांत सुतार यांनी आयोजित कार्यक्रमात केले. राजापूर अर्बन बँकेच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बँकेच्या नवाळे कॉप्लेक्स येथील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमा प्रसंगी व्यासपीठावर बँकेचे उपाध्यक्ष सुनिल जाधव, संचालक संजय ओगले, सौ.अनामिका जाधव, राजेंद्र कुशे, अनिलकुमार करंगुटकर, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे संचालक प्रकाश भावे, सुहास पाटणकर, संजय कुळी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे, एसडीओ प्रसन्न मालपेकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी व्यवस्थापन मंडळ रचना कार्य आणि कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा या विषयावर बोलताना अॅड.सुतार यांनी कर्मचाऱ्यांना अत्यंत उद्घोदक असे मार्गदर्शन केले. कर्मचाऱ्यांनी कायमच बँकेप्रती काम करताना आपली आणि बँकेची प्रतिष्ठा जपली पाहिजे आणि आपल्या कामातुन बँकेचा नावलौकिक वाढविला पाहिजे असे सांगितले. तर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार गठीत झालेल्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या माध्यमातुन बँकेला अधिक सक्षम करण्यासाठी मंडळ काम करेल आणि बँकेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करेल असेही नमुद केले. याप्रसंगी ग्राहक ओळखा व अॅन्टी मनी लॉन्डरिंग ' या विषयावर बोलताना बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे संचालक पाटणकर यांनी आपला ग्राहक कसा ओळखायचा, केवायसी अपडेड कशा प्रकारे ठेवायचे व होणारी फसवणूक कशी टाळायची याबाबत मार्गदर्शन केले. व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्रकाश भावे यांनी संवाद कौशल्य या विषयी मार्गदर्शन केले. तर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी सकारात्मक दृष्टीकोन या विषयावर बोलताना बँकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन काम केले पाहिजे असे नमुद करताना भविष्यातील पाच वर्षातील आपण केलेले संकल्प पुर्णत्वाला न्यायचे असतील तर त्यासाठी ही सकारात्मकता अत्यंत महत्वाची असल्याचे नमुद केले. ३० कोटीची ठेवींची राजापूर अर्बन बँक आज ३०० कोटीच्या पुढे गेली आहे. ही निश्चितच गौरवास्पद अशी बाब असून आता ६०० कोटींचा टप्पा गाठायचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्यातील उर्जेचा वापर हा बँकेच्या प्रगतीसाठी केला पाहिजे असे आवाहन केले. याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष सुनिल जाधव, अनिलकुमार करंगुटकर यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अधिकारी रमेश काळे यांनी केले. या शिबीराला बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या

news.mangocity.org