सामाजिक कार्यकर्ते श्री. नितीन जाधव यांचा भाजपामध्ये प्रवेश
सामाजिक कार्यकर्ते श्री. नितीन जाधव यांचा भाजपामध्ये प्रवेश
श्री. नितीन जाधव पंतप्रधान मोदी यांचा दूत बनून अंत्योदयासाठी कार्य करतील : ॲड. दीपक पटवर्धन
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील प्रभाग क्र.१ मधील लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते श्री. नितीन जाधव यांनी दिनांक १० ऑक्टोबर २०२१ रोजी परटवणे येथे झालेल्या भरगच्च कार्यक्रमात भा.ज.पा.मध्ये प्रवेश केला. भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी भा.ज.पा.चे उपरणे व पुष्पगुच्छ देत श्री.नितीन जाधव यांना जाहीर कार्यक्रमात भा.ज.पा. प्रवेश दिला. परटवणे येथे झालेल्या या शानदार समारंभात प्रभाग क्रमांक १ मधील वाडी वस्ती मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना श्री.नितीन जाधव यांनी आपल्याला सामाजिक कामाची आवड असल्याने सातत्याने लोकांचे प्रश्न, अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असतात असे सांगितले. जनतेचे प्रश्न, अडचणी प्रभावी पद्धतीने सोडवण्यासाठी भा.ज.पा.चे पाठबळ अधिक आवश्यक आहे याची जाणीव झाली. तसेच नरेंद्रजी मोदी यांचे नेतृत्व, त्यांनी घेतलेले निर्णय त्यांची कार्यपद्धती यांनी प्रभावित होऊन भा.ज.पा.च्या ध्येयधोरणांशी एकरूप होऊन प्रभावी काम करण्यासाठी या प्रभागातील जनतेचा पाठिंबा घेत आपण आज भा.ज.पा. प्रवेश केला आहे असे सांगत भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले. याप्रसंगी भा.ज.पा. संघटन सरचिटणीस श्री.राजेश सावंत यांनी रत्नागिरी नगर परिषदेच्या अनागोंदी कारभारावर आसूड ओढले व प्रभाग क्र.१ च्या विकासासाठी भा.ज.पा. कटिबद्ध आहे असे सांगत श्री.नितीन जाधव यांचे पक्षात स्वागत केले. याप्रसंगी बोलताना जिल्हा सरचिटणीस श्री. सचिन वहाळकर यांनी मोदी शासनाच्या कामकाजाचा आढावा आपल्या भाषणात मांडला व श्री.नितीन जाधव यांच्या भा.ज.पा प्रवेशाने शहर भा.ज.पा.ची ताकद वाढल्याचे नमूद केले. श्री. सचिन करमरकर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रभाग क्र.१ मधील नागरिकांनी मला सतत पाठिंबा दिला तसाच पाठिंबा, तुमचे बळ श्री.नितीन जाधव यांच्या पाठीशी ऊभे करा असे आवाहन उपस्थित जनसमुदायाला करत श्री.नितीन जाधव यांचे पक्षात स्वागत करताना शहर उपाध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती जाहीर केली. तसेच मोदीजींचे शासन गोरगरिबांसाठी काम करतंय. अनेक योजना गरीब कल्याण, मातृवंदना, अटल पेन्शन, उज्वला गॅस अशा अनेक योजना मोदीजींनी जनतेसाठी राबवल्या. त्यांचा लाभ लाभार्थीपर्यंत पोहोचविण्यासाठी मोदीजींचा दूत बनून काम करण्याची जबाबदारी श्री.नितीन जाधव यांनी स्वीकारावी. श्री.नितीन जाधव यांचा भा.ज.पा. प्रवेश हा प्रातिनिधिक आहे. नितीनला शुभेच्छा देण्यासाठी जमलेला सर्व जनसमुदाय आज भा.ज.पा. मध्ये सामील झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. भा.ज.पा च्या पाठीशी खंबीर समर्थन उभे करा. या प्रभागातील प्रश्न, अडचणी सोडवून या प्रभागाला विकासाचा मूळ धारेत नेण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करू या असे आवाहन ॲड.दीपक पटवर्धन यांनी आपल्या भाषणात केले. या कार्यक्रमाला प्रभाग क्र.१ मधील नागरिकांनी मोठी उपस्थिती दाखवली. भा.ज.पा. नगर सेविका सौ.प्रणाली रायकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. नगरसेवक श्री.उमेश कुळकर्णी यांनी निवेदनाची भूमिका पार पाडली. मोठ्या संख्येने भा.ज.पा. पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. श्री. बाबू सुर्वे, श्री.उमेश खंडकर, श्री.राजू तोडणकर, सौ.शिवलकर, सौ.जठार, सौ.प्राजक्ता रुमडे, सौ.पल्लवी पाटील, श्री.नंदू चव्हाण, श्री.संकेत चवंडे, श्री.संदीप रसाळ, श्री. मनोज पाटणकर, श्री.हळदवणेकर, श्री.भय्या मलुष्टे, श्री.विक्रम जैन आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर श्री.नितीन जाधव यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी रीघ लागली होती.
....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा