साखरपा येथे लसीकरण शिबिराला सुरवात






 साखरपा येथे लसीकरण शिबिराला सुरवात


दिवसभर लसीकरण राहणार सुरू, जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा- बाळ माने यांनी केले आवाहन

प्रतिनिधी

साखरपा मिशन कवच कुंडल या मोहिमेअंतर्गत आज दि यश फाउंडेशन आणि सिरम इन्स्टिट्यूटच्या वतीने साखरपा येथील श्रीराम मंदिरात मोफत कोव्हीशिल्ड लसीकरण शिबीराला उत्साहात प्रारंभ झाला आहे. या शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून दि यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त तथा माजी आमदार, भाजपा नेते बाळासाहेब माने यांनी केले.

या वेळी श्री. माने यांच्यासमवेत कोंडगाव सरपंच बापूसाहेब शेट्ये, रत्नागिरी जिल्हा व्यापारी संघ सरचिटणीस श्रीधर कबनूरकर, ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेशशेठ गांधी, संजयशेठ गांधी, भाजपचे ओबीसी सेल संगमेश्वर तालुकाध्यक्ष शंकरराव लाड, ज्येष्ठ मार्गदर्शक विजय उर्फ बाबूशेठ गांधी, व्यापारी व साखरपा कोंडगावचे खोत गिरीश शेठ सरदेशपांडे, देवस्थानचे मान्यवर विश्वस्थ. दि यश फाउंडेशनचे दीपक घवाळी, पांडुरंग पाचकुडे उपस्थित होते.

रविवारी राजापूर तालुक्यातील कोंडसर बुद्रुक ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून लसीकरण शिबिराला उदंड प्रतिसाद लाभला. त्याचप्रमाणे आगामी काळात विविध ग्रामपंचायतींमध्ये मोफत लसीकरण करण्याचा संकल्प केल्याची माहिती बाळ माने यांनी यावेळी दिली.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या