पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता अजून एक दरवाढ? केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या किंमती तब्बल ६२ टक्क्यांनी वाढवल्या!

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता अजून एक दरवाढ? केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या किंमती तब्बल ६२ टक्क्यांनी वाढवल्या!
नैसर्गिक वायूंच्या किंमतीत केंद्र सरकारने तब्बल ६२ टक्क्यांनी वाढ केल्यामुळे त्याचा परिणाम सीएनजीवर होऊ शकतो.
सीएनजी, घरगुती गॅस महागणार?
केंद्रानं जाहीर केलेल्या किंमतीनुसार, १ ऑक्टोबरपासून कठीण तेल क्षेत्रातून उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक वायूचे दर प्रति दशलक्ष ब्रिटीश थर्मल युनिटसाठी (BTU) २.९० डॉलर इतके असणार आहेत. हा नैसर्गिक वायू प्रामुख्याने सीएनजी आणि मोठ्या शहरांमध्ये पाईपद्वारे पुरवण्यात येणाऱ्या घरगुती गॅसच्या निर्मितीमध्ये वापरला जातो. त्यामुळे नैसर्गिक वायू दरवाढीपाठोपाठ सीएनजी आणि पाईपने पुरवल्या जाणाऱ्या घरगुती गॅसच्या किंमती देखील वाढण्याची शक्यता आहे.

परिणाम काय?
नैसर्गिक वायूच्या किमतीतील वाढीमुळे सीएनजी, तसेच मुंबई व दिल्लीसारख्या शहरांमधील पाइपने मिळणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत १० ते ११ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, यामुळे वीजनिर्मितीच्या खर्चातही वाढ होईल, मात्र वायूपासून तयार होणाऱ्या विजेचे प्रमाण अतिशय कमी असल्याने ग्राहकांना त्याची फारशी झळ पोहोचणार नाही.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment