दुर्गादेवी मुर्ती विसर्जना व्यतिरिक्त समुद्र किनारी अन्य व्यक्तींना मनाई

 


दुर्गादेवी मुर्ती विसर्जना व्यतिरिक्त समुद्र किनारी अन्य व्यक्तींना मनाई 

  रत्नागिरी:रत्नागिरी शहरातील मांडवी  समुद्र किनारी  15 ऑक्टोबर व 16 ऑक्टोबर 2021 रोजी विसर्जन ठिकाणी दुर्गादेवी मुर्ती घेऊन येणाऱ्या भाविकांना प्रवेश असावा तेथे दुर्गादेवी विसर्जनाशिवाय अन्य कोणत्याही कारणासाठी जाण्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(4), 43 नुसार मनाई करण्यात येत आहे. 

   मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(4) नुसार - “पोट-कलम (1) अन्वये कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा सार्वजनिक प्रयोजनासाठी तात्पुरती राखून ठेवता येईल आणि  प्राधिकारी विहित करील त्या शर्तीनुसार असलेल्या प्रवेशाव्यतिरिक्त अन्य बाबतीत कोणत्याही व्यक्तीला अशा राखून ठेवलेल्या जागेत प्रवेश करण्यास मनाई करता येईल" अशी तरतुद आहे. 

    त्यानुसार जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(4) व 43, सन 1951 चा कायदा 22 वा, नुसार  मिळालेल्या अधिकारान्वये रत्नागिरी शहरातील मांडवी  या समुद्र किनारी 15 ऑक्टोबर 2021 व  16 ऑक्टोबर 2021 या तारखांना विसर्जनासाठी दुर्गादेवी मुर्ती घेऊन येणाऱ्या लोकांनाच प्रवेश राहील. 

   तथापि, रत्नागिरी शहरातील मांडवी  या समुद्र किनारी 15 ऑक्टोबर 2021 व  16 ऑक्टोबर 2021 या तारखांना विसर्जना व्यतिरिक्त समुद्र किनारी फिरण्यासाठी अथवा दुर्गादेवी विसर्जन सोहळा पाहण्यास येणाऱ्या अन्य लोकांना कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व गर्दी होऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये या हेतूने मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(4) व 43 अन्वये प्रवेशास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या