मंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अविनाश लाड यांचा पदग्रहण सोहळा संपन्न

 


मंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अविनाश लाड यांचा पदग्रहण सोहळा संपन्न


राजकिय वर्तुळात खलबते सुरु?


रत्नागिरी प्रतिनिधी: 

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उद्घाटन  करण्यात आलेल्या इमारतीमध्ये म्हणजेच काँग्रेस भूवन या इतिहासिक वास्तू मध्ये जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून हजारो संख्येच्या उपस्थितीत, गृह राज्यमंत्री ना.सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. अविनाश लाड नवी मुंबई महानगर पालिकेचे माजी उपमहापौर, विद्यमान नगरसेवक आहेत. अविनाश लाड यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात कुणबी कार्ड म्हणून उल्लेख केला जातो. त्यामुळे अविनाश लाड कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष झाल्यामुळे आता राजकिय वर्तुळात खलबते सुरु झाली आहेत. 

रत्नागिरी शहरामध्ये जागोजागी लागलेले बॅनर, काँग्रेसचे झेंडे त्यामुळे संपूर्ण शहर काँग्रेसमय झालेले वाटत होते. त्यामध्येच औचित्य साधून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले राज्याचे गृहराज्यमंत्री ना.सतेज पाटील , माजी खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार, प्रदेश सरचिटणीस हुस्नबानु खलिफे, रत्नागिरी जिल्हा प्रभारी मनोज शिंदे, अनुसूचित जातीचे राज्य समन्वयक सुनील सावर्डेकर यांच्यामुळे कार्यक्रमाला रंगत अधिक वाढली होती. यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले रत्नागिरी जिल्हा आणि इथली माती माझ्यासाठी नवीन नाही आहे. मुंबईला जरी राहत असलो तरी शेती करायला गावीच येत होतो. भात लावणी कापणी कशी करायची हे लहानपणापासून संस्कार झालेले आहेत. नदीतील मासे कसे काढायचे कसे गळाला अडकवायचे मला चांगलेच जमते. यावेळी सोशल मिडीयाचे विनय खामकर, महिला जिल्हाध्यक्षा ॲड.अश्विनी आगाशे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन, राजापूरचे नगराध्यक्ष जमीर खलिफे, कपिल नागवेकर, युवक जिल्हाध्यक्ष अविनाश मोहिते, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष अमित पवार, महिला प्रदेश सरचिटणीस रूपाली सावंत,प्रदेश सचिव सुस्मिता सुर्वे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव,जिल्हा उपाध्यक्ष रमेश शहा, जिल्हा सरचिटणीस बंडूशेठ सावंत, जिल्हा सरचिटणीस दिपक राऊत, जिल्हा सरचिटणीस माजी उपनगराध्यक्ष बळाशेठ मयेकर, जिल्हा चिटणीस बंटी गोताड, अशपाक काद्री, तालुकाध्यक्ष प्रसाद उपळेकर, चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, संगमेश्वर तालुकाध्यक्ष दत्ता परकर, राजापूर तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर, विधानसभा अध्यक्ष सचिन मालवणकर, बशीर मुजावर, महादेव चव्हाण, याकूब सय्यद, प्रकाश चव्हाण , प्रमोद सक्रे, शफाकत काद्री, रवी खेडेकर, चेतन नवरांगे, दर्शन सक्रे, महिला तालुकाध्यक्ष रिझवाना शेख, नूतन गोरिवले, बब्या हेगिस्टे, अनिरुद्ध कांबळे, अल्पेश मोरे, अनंत पिसे आदी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या