राजापूर पंचायत समितीच्या अजब कारभारामुळे अनेक लाभार्थी शौचालयाच्या लाभापासून वंचित?


 राजापूर पंचायत समितीच्या अजब कारभारामुळे अनेक लाभार्थी शौचालयाच्या लाभापासून वंचित?


रत्नागिरी जिल्हा परिषद शौचालय अनुदान वाटप, प्रत्यक्ष शौचालय उभारणीबाबत प्रत्यक्ष चौकशी करणार का?


रत्नागिरी प्रतिनिधी:-

राजापूर तालुक्यात हागणदारी मुक्त गाव अभियान गेली वर्षानुवर्षे राबवले जात आहे. त्या माध्यमातून शासनाच्या वतीने शौचालय उभारणीसाठी अनुदान दिले जाते. मात्र राजापूर पंचायत समितीच्या वतीने अनेक लाभार्थ्यांना या लाभापासूनच वंचित ठेवले जात असल्याचे बोलले जात आहे. काही लाभार्थ्यांकडे जमिनीचे वाद आहेत. मात्र त्यांना शौचालयाची नितांत आवश्यकता आहे. शौचालय मंजूर असूनही प्रत्यक्षात शौचालय उभारण्यात आलेले नाही. काही ठिकाणी शौचालय बांधून पूर्ण झाले. त्याची अधिका-यांकडून पाहणीही झाली. नंतर सांगितले गेले की त्या संबंधित लाभार्थ्याने पूर्वी शौचालय नको असे लिहुन दिले आहे. अशी काही कारणे सांगून एक तर लाभाचे पैसेच दिले जात नाहित किंवा शौचालय उभारले का हे पाहिलेही जात नाहित. अशा काही घटना घडत आहेत. याची पडताळणी जिल्हा परिषद प्रशासन घेणार का असा सवाल उपस्थीत केला जात आहे.


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या

news.mangocity.org