रत्नागिरीतील साळवी स्टॉप ते माळनाका यादरम्यान रस्त्याचे काहीशा प्रमाणात डांबरीकरण झाल्याने नागरीकांना मिळाला दिलासा




 रत्नागिरीतील साळवी स्टॉप ते माळनाका यादरम्यान रस्त्याचे काहीशा प्रमाणात डांबरीकरण झाल्याने नागरीकांना मिळाला दिलासा


टीकाकार चांगल्या कामाची देखील दखल कधी घेणार?


रत्नागिरी प्रतिनिधी:-

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांनी रत्नागिरी शहरातील सर्व रस्त्यांचे 1 जानेवारी च्या अगोदर पूर्णत: डांबरीकरण केले जाईल असे आश्वासन रत्नागिरीकरांना दिले असून त्या अनुषंगाने रत्नागिरी शहरात रस्त्यांच्या डांबरीकरण करण्याच्या कामाला सुरुवात देखील झाली आहे. रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप ते माळनाका यादरम्यान मुख्य रस्त्यावर कालच्या प्रमाणात डांबरीकरण झालेले असल्यामुळे नागरीक काहीशा प्रमाणात सुखावले आहेत. शहरातील काही प्रभागांमध्ये देखील रस्त्यांचे डांबरीकरण याला सुरुवात झाली असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. रत्नागिरीतील काही लोक मागिल वर्षभरापासून शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाबाबत सतत टीका करत होते. मात्र आता पर्जन्यवृष्टीचे प्रमाण कमी झाले असून रस्ते डांबरीकरणाला सुरुवात झाली असल्याने टीकाकार या चांगल्या कामाचे कौतुकही करतील का असा सवाल उपस्थीत होत आहे.


२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या