गणेशोत्सवात कोकण रेल्वेने केली २ लाख ४० हजार प्रवाश्यांची वाहतूक




 गणेशोत्सवात कोकण रेल्वेने केली २ लाख ४० हजार प्रवाश्यांची वाहतूक


योग्य नियोजन करत कोकण रेल्वेची कौतुकास्पद कामगिरी


रत्नागिरी : कोरोनाच्या काळात श्रमिक स्पेशल च्या माध्यमातून महत्वाची कामगिरी करणाऱ्या कोकण रेल्वेने गणेशोत्सवातहि लाखो भाविकांची सुखरूप ने आण करत कौतुकास्पद कामगिरी केलेय . या गणेशोत्सवाच्या काळात तब्बल  २ लाख ४० हजाराहून अधिक भाविकांची कोकण रेल्वेने ने आण केली . या तुन कोकण रेल्वेने ७  कोटी ७२  लाख रुपयांचा व्यवसाय केलाय. आपल्या नियमित गाड्यांचे वेळापत्रक बिघडू न देता सलग२० दिवसातील २५० हुन अधिक जादा  गाड्यांच्या फेऱ्यांचे हे नियोजन कोकण रेल्वेच्या कर्मचारीअधिकाऱ्यांनी २४-२४ तास सलग काम करत यशस्वी केलं आहे.

        कोरोनाच्या काळात कोकण रेल्वेने कोकणातील श्रमिकांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पोहोचवण्याची जवाबदारी यशस्वीपणे  पार पडल्यामुळे कोकण रेल्वेने त्यावेळी केलेल्या नियोजनाचे कौतुक झाले  होते. आता गणेशोत्सवातही कोकणरेल्वेने महत्वपूर्ण कामगिरी पार पाडली आहे . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या गणेशोत्सवात लाखोंच्या संख्येने कोकणात येणाऱ्या भाविकांच्या प्रवासाच्या नियोजनाबद्दल अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाली असताना कोकण रेल्वेने नेटकं निजोजन करत मुंबईतून कोकणातील गावागावात आणि उत्सवाच्या सांगतेनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखरूप बनवला .

     गणेशोत्वासाठी कोकण रेल्वेने टप्याटप्याने नियोजन करत कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी स्पेशल गाड्यांची घोषणा केली. पहिल्या टप्यात जाहीर झालेल्या गाड्या तात्काळ आरक्षित होताच चाकरमान्यांना कोकणात येण्यासाठी अधिकच्या स्पेशल गाड्यांची घोषणा करण्यात आली . उत्सवाच्या दोन दिवस आधीपासून उत्सवाच्या सांगातेपर्यंत कोकण रेल्वेने मार्गावर तब्बल २५६ गाड्यांचे नियोजन केले . नियमित मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक सांभाळत अधिकच्या २५६ फेऱ्या मार्गावरून नेणे सोपे नव्हते पण हे आव्हान कोकण रेल्वेच्या कामगार अभियंता आणि अधिकाऱ्यानी  या काळात आपल्या घरात उत्सव  असताना  अहोरात्र काम करत यशस्वी केले . या काळात तब्बल २ लाख ४३ हजार ३७६ चाकरमान्यांनी या ट्रेन मधून प्रवास केला . यातून ७ कोटी ७२ लाख रुपयांचा व्यवसाय कोकण रेल्वेने केला .

     या संपूर्ण काळात कोठेही गोंधळाची स्थिती निर्माण झाली नाही . कोव्हीड च्या सर्व नियमांची अंमलबजावणी करत प्रवाश्यांची ने आण करण्यात आली . गणेशोत्सवापूर्वी आधी युद्ध पातळीवर काम करत कोकण रेल्वेने वीर ते रोहा या मार्गावरील दुपदरीकरणाचे काम पूर्ण करून घेतले. याचा फायदा गणेशोत्वाच्या काळात झाल्या. कोकण रेल्वे  ने केलेल्या योग्य नियोजनामुळे या काळात कोणत्याच गाड्या मार्गावर रखडल्या नाहीत आणि चाकरमानी वेळेत आपल्या नियोजित ठिकाणी पोहोचला. परतीच्या प्रवासात हि बोगीचे  दरवाजे न उघडल्याने होणारे गोंधळ; कोकण रेल्वेने त्याचे हि नियोजन योग्य पद्धतीने केल्याने टळले .कोकण रेल्वेने वेळोवेळी केलेली वेळापत्रके लोकांपर्यंत पोहोचण्यात माध्यमांनी मोठं सहकार्य केले.जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी महिनाभरा आधीपासून नियोजन केल्याने आरोग्य तपासणी आणि वाहतूक नियमनाची कामे सोपी झाली. या करीता कोकण रेल्वेने सहकार्य करणाऱ्या या सर्व यंत्रणांचे आभार मानले.

    कोकण रेल्वेच्या सर्वच स्तरावरील कर्मचारी आधिकारी यांच्यासह  आर पी एफ ,स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने संपूर्ण सहकार्य केल्याने हे नियोजन यशस्वी झाले अशा भावना कोकण रेल्वे कडून  व्यक्त करण्यात आल्या आहेत.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या