रत्नागिरीतील मावळंगे नातूंडे गावात अवैध दारु विक्रीला ऊत?, पावस बाजारपेठेत देखील होतेय अवैध दारु विक्री?
रत्नागिरीतील मावळंगे नातूंडे गावात अवैध दारु विक्रीला ऊत?, पावस बाजारपेठेत देखील होतेय अवैध दारु विक्री?
रत्नागिरी प्रतिनिधी:-
रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे नातुंडे या गावात अवैध दारु विक्री होत असल्याचे बोलले जात असून या भागातील सुजाण तरुण, ज्येष्ठ नागरिक तिव्र संताप व्यक्त करत आहेत. नजिकच गावडे आंबेरे गाव आहे. मावळंगे गावाच्या आजुबाजुच्या भागातील अनेक लोक सायंकाळच्या वेळेस दारु प्यायला जात असल्याचे बोलले जात आहे. सदरची दारु विक्री एका शाळेच्या आजुबाजुच्या परिसरातच होत असल्याचे बोलले जात आहे. गावठी दारुसह गोवा बनावटीची दारु विक्री होत असल्याचे बोलले जात आहे. तसेच पावस बाजारपेठेत देखील अवैध दारु विक्री होत असल्याचे बोलले जात आहे. या भागातील बीट अंमलदार गावात जाऊन खरोखरच अवैध दारु विक्री होतेय का? याचा आढावा जिल्हा पोलिस प्रशासन घेईल का असा सवाल उपस्थीत केला जात आहे. गावडे आंबेरे गावातील एका एस.टी.प्रवासी निवारा शेड येथे शेकडो बियर बोटल्स तसेच प्लास्टिक पिशव्या तसेच अन्य काही कचरा मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यामुळे तळीराम या प्रवासी निवारा शेड मध्ये रात्रीच्या वेळेस दारु पिण्यास बसतात का असा सवाल उपस्थीत होत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने देखील यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करु शकते का? प्रत्यक्ष स्थळ पाहणी करु शकते का? असे सवाल उपस्थीत केले जात आहेत.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा