राजापूर नगर परिषदेच्या वतीने आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा सन्मान
स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियानांतर्गत राजापूर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अॅड.जमीर खलिफे, मुख्याधिकारी तुषार बाबर व मुख्यलिपिक जितेंद्र जाधव, नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना महामारीच्या वैश्विक संकट काळात व शासनाच्या आवाहनाला ज्या आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी आपले अतुलनीय कार्यासाठी व समाजहिताच्या द्दृष्टिने कौतुकास्पद कामगिरी बजावून त्यांनी मोलाचे कार्य केले. म्हणून यांना कोरोना योद्धांचा सन्मान करुन त्यांना सन्मानपत्र व धनादेश देवुन गौरविण्यात आले. हा सन्मान सोहळा राजापूर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अॅड.जमीर खलिफे, उपनगराध्यक्ष तथा आरोग्य सभापती आसिफ मुजावर, पाणी सभापती सौ. स्नेहा कुवेसकर, नगरसेविका सौ. स्वाती बोटले, शुभंगी सोलगावकर, यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत आभार व्यक्त केले. तसेच टेनिस क्रिकेट संघाचा तृतीय क्रमांक पटकावलेले राजापूर शहराच्या पुर्वा बाकाळकर हिचा सन्मान करण्यात आला. उपस्थित अंगणवाडी सेविका यांनी स्वच्छते विषयी माहिती सांगून ती अंमलात आणावी व आपले स्वच्छतेविषयी कर्तव्य पार पाडावे असे सांगण्यात आले. कार्यक्रमाची सांगता हरित शपथ घेऊन करण्यात आली. यावेळी सुत्रसंचालन आरोग्य पर्यवेक्षक सौ. श्रेया शिरवटकर यांनी केले. तसेच आरोग्य लिपिक सौ. अनुष्का जुवेकर, पुर्वा कांबळे, राजन जाधव, संदेश जाधव, संदेश राडी आदि कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment