खाद्यतेलाच्या साठ्यावर ३१ मार्चपर्यंत निर्बंध

खाद्यतेलाच्या साठ्यावर ३१ मार्चपर्यंत निर्बंध
सणासुदीच्या काळात खाद्यतेलाचे दर वाढत असल्याने त्याला मर्यादा घालण्यासाठी केंद्राने खाद्यतेल व तेलबियांच्या साठ्यावर व्यापाऱ्यांसाठी ३१ मार्चपर्यंत निर्बंध घातले आहेत.
आयातदार व निर्यातदार यांना त्यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे देशांतर्गत पातळीवर तेलाचे भाव आटोक्यात राहून ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
८ ऑक्टोबरपासून एनसीडीइएक्स मंचावर मोहरीच्या तेलाचे फ्युचर ट्रेडिंग रोखण्यात आले आहे. तेलाच्या देशांतर्गत किमती गेल्या एक वर्षात ४६.१५ टक्के वाढल्या असून जागतिक पातळीवर दर वाढल्याने देशातही दरवाढ झाली आहे.
भारत खाद्यतेलांसाठीही आयातीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवरील पुरवठाही अडचणीत आल्याने तेलाचे दर वाढले आहेत.
केंद्रीय अन्न व ग्राहक कामकाज मंत्रालयाने म्हटले आहे की, केंद्राच्या निर्णयामुळे खाद्यतेलांचे दर कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे ग्राहकांना सणासुदीच्या काळात दिलासा मिळेल.
सर्व राज्यांना नवीन निर्णयाबाबत आदेश जारी करण्यात आले असून खाद्यतेल व तेलबिया यांच्या साठवण मर्यादेचे प्रमाण त्यांनीच पुरवठा लक्षात घेऊन निर्धारित करायचे आहे. त्यात खपाचाही विचार करावा लागणार आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा