रत्नागिरी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.मोहित कुमार गर्ग यांनी जेष्ठ नागरीकांशी व्हीसीद्वारे संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या
रत्नागिरी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.मोहित कुमार गर्ग यांनी जेष्ठ नागरीकांशी व्हीसीद्वारे संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या
रत्नागिरी प्रतिनिधी:-
शुक्रवार रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांशी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.मोहित कुमार गर्ग यांनी संवाद साधला. या अनुषंगाने की जेष्ठ नागरिकांच्या समस्या जाणुन घेऊन, त्या अनुषंगाने पुढील योग्य ती कार्यवाही करण्यासाठी, त्यांच्याशी हितगुज करुन, त्यांना आधार देण्यासाठी पोलीस आणि जेष्ठ नागरिक यांची कोव्हीड-१९ ची साथ येण्यापुर्वी नियमीत बैठक आयोजित करण्यात येत होती. सध्या कोव्हीडची साथ कमी प्रमाणात असल्याने आणि समाजावर असलेली प्रतिबंधात्मक बंधने शिथील झाल्याने, जेष्ठ नागरिकांच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी शुक्रवार दि.०१/१०/२०२१ रोजी पोलीस अधिक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना या अनुषंगाने मार्गदर्शन करुन जेष्ठ नागरिकांशी समन्वय साधण्याच्या सुचना दिल्या होत्या. या पार्श्वभुमीवर आज दि.०१/१०/२०२१ रोजी १२.०० वा. पोलीस अधिक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांशी व्हिसी व्दारे संवाद साधला आणि त्यांच्या अडीअडचणी समजावुन घेतल्या. या बरोबरच जिल्ह्यात मातोश्री वृध्दाश्रम, आंबीए, ता.- खेड येथे पोलीस निरीक्षक श्रीमती निशा जाधव यांनी भेट देऊन तेथील जेष्ठ नागरिकांशी संवाद साधला व भेट वस्तु दिल्या. पोनि.दादासाहेब घुटुगडे यांनी लांजा पोलीस ठाणे येथे, पोनि. बाळकृष्ण जाधव यांनी देवरुख पोलीस ठाणे येथे जेष्ठ नागरिकांची बैठक घेतली. जयगड पोलीस ठाण्याचे सपोनि. जयदीप कळेकर यांनी चाफेरी गावी जाऊन आणि अलोरे शिरगाव व पोलीस ठाण्याचे सपोनि.संदीप पाटील यांनी लिलाबाई वृध्दाश्रम, कळकवणे येथे भेट देवुन जेष्ठ नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडीअडचणी समजावुन घेतल्या आणि त्यांच्या सहाय्यासाठी कटीबध्द असल्याचे आश्वासन दिले. या व्यतिरिक्त जिल्ह्यातील अन्य पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी सुध्दा जेष्ठ नागरिकांशी विविध स्तरावर संवाद साधला.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


Comments
Post a Comment