निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान -शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचे वक्तव्य
निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. दारुची दुकाने उघडी ठेवायला सांगणारे आणि दुर्गामाता दौडीस बंदी घालणारे राज्यकर्ते बेशरम, नालायक आहेत अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.जसे प्रभू रामचंद्र विवेक हरवून सोन्याच्या हरणाच्या मागे गेले आणि सीतेचे अपहरण झाले तसे राज्यकर्त्यांचा विवेक हरवला आहे असंही यावेळी ते म्हणाले. शिवाजी-संभाजी महाराजांची अंतकरणात वस्ती असती तर संपूर्ण देशाचे नेतृत्व करणारे राज्यकर्ते झाले असते असंही त्यांनी सांगितलं. दसऱ्यानिमित्त साध्या पद्धतीने आयोजित केलेल्या दुर्गामाता दौडीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
"जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश आहे. मग आपल्या देशाचा पहिला क्रमांक कधी येणार? पण आपण तो मिळवला आहे. आपला कट्टर शत्रू असणारा चीन लोकसंख्येत पुढे आहे, त्यामुळे ते आपल्याला जमलं नाही. पण निर्लज्जपणात आपल पहिल्या क्रमांकावर आहोत," असं संभाजी भिडे म्हणाले आहेत.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा