परतीच्या पावसाचे भातपिकावर सावट



परतीच्या पावसाचे भातपिकावर सावट


शेतकरी चिंतेत

गेल्या तीन दिवसांपासून सायंकाळच्या वेळेत मुसळधार कोसळणाऱ्या परतीच्या पावसामुळे भाताचे हाती आलेले पीक धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोसाटय़ाचा वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस यांमुळे शेतकरी चिंतेत आहे. यंदाच्या वर्षांत उशिरा सुरू झालेल्या पावसाने भातशेती धोक्यात आणली होती. त्यानंतरही कौशल्याने शेतकऱ्यांनी यंदा भाताचे पीक वाढवले. आता शेवटच्या टप्प्यात शेतकऱ्यांपुढे परतीच्या पावसाचे संकट उभे आहे.

गेल्या तीन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात सध्याच्या घडीला पारंपरिक भात पिकासोबत लाल, काळा आणि निळय़ा तांदुळाची लागवड करण्यात आली आहे. त्याचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर चांगला परिणाम होणार आहे. हे पीक हाती आले असतानाच परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सायंकाळी धुमाकूळ घालणाऱ्या पावसामुळे शेतकरी चिंतेत आहेत. सोसाटय़ाचा वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे दोनच दिवसात जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील भातपिकाला फटका बसला आहे.

ज्या पिकांची उंची अधिक आहे अशा शेतातील काही पिके वाऱ्यामुळे झोपली आहेत. परतीचा पाऊस

असाच आणखी काही दिवस येत राहिल्यास त्याचा फटका पिकाला बसण्याची भीती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पाऊसापेक्षा वारा पिकांचे अधिक नुकसान करेल, अशीही शक्यता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

परतीच्या पावसाचा धुमाकूळ आम्हा शेतकऱ्यांना तसा नवा नाही. गेल्या काही वर्षांत मात्र या पावसाचे स्वरूप फारच आक्रस्ताळे झाले आहे. सोसाटय़ाचा वादळी वारावीज कोसळणेढगफुटीसारखा पाऊस पडत असल्याने भात पिकाचे नुकसान होत आहेगेल्या वषी ते झाले यंदाही चित्र काही वेगळे नाही.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या