कार्यक्रमाच्या पत्रिकेत नावे नाहीत म्हणून जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून राजकारण व्हावे, यासारखी दुसरी वाईट गोष्ट नाही- मंत्री उदय सामंत


 कार्यक्रमाच्या पत्रिकेत नावे नाहीत म्हणून जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून राजकारण व्हावे, यासारखी दुसरी वाईट गोष्ट नाही- मंत्री उदय सामंत  


रत्नागिरी:समितीच्या इमारतीच्या भूमीपुजन कार्यक्रमाच्या पत्रिकेत नावे नाहीत म्हणून जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून राजकारण व्हावे, यासारखी दुसरी वाईट गोष्ट नाही. पंचायत समितीच्या नविन इमारतीत फक्त पदाधिकारीच जाऊन बसणार नाहीत तर अधिकारीही जाऊन बसणार आहेत, याचाही विचार करावा.जी पत्रिका छापली आहे ती उत्तम सावंत यांनी छापली आहे. त्यांनी त्याची जबाबदारी घेतली आहे. पण जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना आवर घाला असा सल्ला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिला. ते मंगळवारी रत्नागिरी पंचायत समितीच्या नुतन इमारतीच्या भूमीपुजन समारंभाप्रसंगी बोलत होते.

भूमीपुजन समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची नावे नसल्यामुळे अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला दांडी मारली होती. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते. अल्पबचत सभागृहासमोर रत्नागिरी पंचायत समितीच्या नव्या इमारतीचे भूमीपुजन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, पंचायत समितीच्या सभापती संजना माने, उपसभापती उत्तम सावंत, जि. प. समाज कल्याण सभापती परशुराम कदम, महिला व बालकल्याण सभापती भारती सरवणकर, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, महिला तालुका संघटक कांचन नागवेकर, सर्व पंचायत समिती सदस्य, जि. प.सदस्य आणि इतर अधिकारी उपस्थित होते.



....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या

news.mangocity.org