राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या प्रयत्नांने ८ रुग्णवाहिका राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघासाठी मंजूर.....


 राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या प्रयत्नांने ८ रुग्णवाहिका राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघासाठी मंजूर.....

           शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान. ना. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब व महाविकास आघाडीचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री मा.ना अजित पवार तसेच मदत पुनर्वसन मंत्री मा.ना विजय वडेट्टीवार आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या माध्यमातून तसेच शिवसेना सचिव, शिवसेना लोकसभा गटनेते, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार विनायकजी राऊत, रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री मा.ना अनिलजी परब ह्यांच्याकडे राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या सतत पाठपुराव्यातुन ८ रुग्णवाहिका राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघासाठी मंजूर करण्यात आल्या आहेत. 

               आज जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ सभापती चंद्रकांत मंचेकर व संगमेश्वर सभापती जयसिंग माने ह्यांच्या हस्ते लोकार्पण होणाऱ्या ८ रुग्णवाहिका राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातील १ भांबेड प्राथमिक आरोग्य केंद्र, १ रिंगणे प्राथमिक आरोग्य केंद्र, १ धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्र, १ जवळेथर प्राथमिक आरोग्य केंद्र, १ देवळे प्राथमिक आरोग्य केंद्र, १ साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्र, १ सोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व जावडे प्राथमिक आरोग्य केंद्र ह्यांना रुग्णवाहिका देण्यात येणार आहे.

          मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना विजय वडेट्टीवार हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना रुग्णवाहिका देण्याची मागणी शिवसेना सचिव, शिवसेना लोकसभा गटनेते, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार विनायकजी राऊत व राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी केली होती. ती मागणी पूर्ण करण्यात आली आहे.

              महाविकास आघाडी सरकार कडे केलेल्या मागणीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र, व रुग्णालयांची गरज ओळखून पुन्हा एकदा नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान. ना. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब व महाविकास आघाडी सरकारचे आभार मानतो.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या

news.mangocity.org