व्हॅट कमी करण्याची मागणी, वाहतूकदार संघटनेच्या मुंबईतील बैठकीत नाराजी
व्हॅट कमी करण्याची मागणी, वाहतूकदार संघटनेच्या मुंबईतील बैठकीत नाराजी
शंभरी पार डिझेलवर वाहतूकदार संघटनांमध्ये मोठी नाराजी बघायला मिळत आहे. त्याचसोबत डिझेलच्या दराबाबत चिंता देखील सर्वांकडून व्यक्त केली जात आहे. अशातच वाढत्या डिझेलच्या संदर्भात केंद्र आणि राज्यांनी काही निर्णय घ्यावा म्हणून वाहतूकदार संघटनांकडून तातडीची अंतर्गत बैठक घेण्यात आली. ज्यात डिझेलचे दर कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्यांना मागणी करणार असल्याची माहिती ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट कॉंग्रसचे अध्यक्ष आणि कोअर कमिटी मेंबर बलमल्कित सिंह यांनी दिली आहे. केंद्राकडून डिझेलवर मागील अनेक महिन्यात मोठ्या प्रमाणात एक्साईज ड्युटी वाढवण्यात आली आहे. त्याचसोबत राज्यांनी देखील डिझेलवर मोठ्या प्रमाणात व्हॅट लावला आहे. अशातच केंद्रानं डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करावी तसेच सर्व राज्यांनी देखील इंधनावरील व्हॅट कमी करावे, अशी मागणी वाहतुकदार संघटनेकडून करण्यात येणार आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा