काव्यपुष्प
काव्यपुष्प
स्त्री तुझी व्यथा
रांधा वाढा उष्टी काढा
नाही आयुष्य बाईचे
चूल मुल सोडूनही
जाणा मन एका स्त्रीचे
वंश वाढीसाठी उगा
किती करावी हो घाई
नवजात जन्मताच
होते जिची उतराई
विचारांती सर्वांच्या ती
सुखी ठेवते सासर
कोणी पाहिले असते
जर स्त्री नसती तर
खर तर ती थांबते
नाते स्त्रीचे निभावते
सुखदुःख घरातील
स्वतः एकटी झेलते
होते निभावता सारं
तिच्या स्वप्नांची रांगोळी
तरी देत नाही कोणी
नव्या सुखांना आरोळी
हात जोडून सांगते
तिच्या जन्मातील कथा
नाही कोणी जाणणार
स्त्रीच्या मनातील व्यथा
- नयन धारणकर
-----------------------------
दिल जोड़ रहा हूँ
टूटे दिल जोड़ रहा हूँ।
ऐसी ज़िंदगी जी रहा हूँ।
पता नही जी रहा हूँ या
कोई सज़ा काट रहा हूँ।
बाहर से मझबूत हूं मैं
अंदरसे बिखरा हुआ हूं।
पत्थरों को आज ख़ुदा
मान कर पूज रहा हूँ।
प्यार के लिए ख़ुशीयोँ
की भीख मांग रहा हूँ।
नीक राजपूत
9898693535
------------------------------
शब्दगंध..
जीवन पक्षासारखे असावे
आकाशात उंच कसेही उडावे
मात्र जीवनात शेवटी मरताना
कुणावरही ओझे न ठेवावे...
सौ मधुरा कर्वे. ( भावगंधा )
पुणे.
----------------------------------
आजची चारोळी
याला खुश ठेव, त्याला खुश ठेव
आपण जीवाची कसरत करतो
पण वेळ निघून गेल्यावर
त्याला भूतकाळाचा विसर पडतो .
सौ. हेमा जाधव, सातारा
---------------------------------
शामलाक्षरी
हार अपसूक पचविता
नावलौकिक मिळतो मान
हार तुरे लाभे पदोपदी
आयुष्य मग सुवर्णपान॥
हार = पराभव , फुलांचा
सौ.शामला पंडित(दीक्षित )
प्रणाली प्रकाशन, चिंचवड
------------------------------------
चारोळी
पौर्णिमेच्या चंद्राला
पाहुनी वाटे मनी
चंद्रासम प्रकाश असावा।
जीवनी...
सौ.मेहमूदा शेख.(देहूगाव)
------------------------------
शब्दगंध.
फुलांकडून घेऊ शिकवण
आयुष्यात देऊ सर्वांना सुगंध
सुख दुःख वाटू सर्व मिळून
दृढ होतील ऋणानुबंध..
सौ मधुरा कर्वे. ( भावगंधा )
पुणे.

Comments
Post a Comment