जयगड मध्ये उपसरपंच यांच्यासह सदस्य व काही नागरिकांनी मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मनसेमध्ये केला प्रवेश


 जयगड मध्ये उपसरपंच यांच्यासह सदस्य व काही नागरिकांनी मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मनसेमध्ये केला प्रवेश


रत्नागिरी प्रतिनिधी:-

रत्नागिरी तालुक्यातील जयगड परिसरातील उपसरपंच यांच्यासह सदस्यानी व नागरिकांनी मनसे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चव्हाण  यांच्या उपस्थितीत मनसेमध्ये प्रवेश  केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारणेने प्रेरीत होवून दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून रत्नागिरी उप शहर अध्यक्ष सिद्धेश धुलप, महाराष्ट्र सैनिक सत्यविजय खाडे, श्री.गडदे, किरण बैकर, संदीप बलेकर, प्रसाद गुरव यांच्या प्रयत्नाने जयगड गावातील माजी सरपंच यांचेसह विद्यमान उपसरपंच व सदस्य तसेच काही व्यवसायिक तरूणांनी मनसेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी मनसे उपजिल्हाध्यक्ष रुपेश सावंत, कामगार सेनेचे जिल्हा चिटणीस छोटु खामकर, उप शहर अध्यक्ष अमोल श्रीनाथ, उप शहर अध्यक्ष मयुरेश मडके, मनसैनिक दीपक तांबे आदी उपस्थीत होते. सदरची माहीती रुपेश सावंत यांनी दिली आहे.


....................................
------------------------------

www.freshnewz.in

Comments