राजापूर राष्ट्रवादी युवक विद्यार्थी आणि शहर कॉग्रेस तर्फे यावर्षी पासुन "गणपती सजावट स्पर्धा" चे आयोजन
राजापूर राष्ट्रवादी युवक विद्यार्थी आणि शहर कॉग्रेस तर्फे यावर्षी पासुन "गणपती सजावट स्पर्धा" चे आयोजन
रत्नागिरी प्रतिनिधी:-
राजापूर: राजापूर राष्ट्रवादी युवक विद्यार्थी आणि शहर कॉग्रेस तर्फे यावर्षी पासुन "गणपती सजावट स्पर्धा" आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष आबा आडीवरेकर, पंचायत समिती सदस्य प्रतीक मटकर, अर्बन बँक संचालक सुनील जाधव, माजी अर्बन बँक उपाध्यक्ष संजय ओगले, जिल्हा सरचिटणीस अमोल शिर्सेकर, जिल्हा उपाध्यक्ष भरत लाड, माजी पंचायत समिती सदस्य एकनाथ लाड, जिल्हा उपाध्यक्ष बाळा सावंत, युवक अध्यक्ष मनोहर गुरव, विद्यार्थी अध्यक्ष सकलेन काझी, शहर अध्यक्ष संतोष सातोसे, सरपंच महेश करंगुटकर, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष प्रशांत पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. राजापुरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. या ठिकाणी गणपती बाप्पाना आकर्षक आरास, मखर साकारून त्यामध्ये स्थापन केले जाते. तसेच समाज प्रबोधन करणारे, धार्मिक, पौराणिक, सामाजिक देखावे करण्याची परंपराही राजापूरात आहे. मात्र कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांत उत्साह कमी झाला आहे. त्यामुळे या कोरोना काळातही आपल्या बांधवांचे देखावे, आकर्षक सजावट करण्याचे कौशल्य कायम रहावे, त्यांना चालना मिळावी, म्हणून ही स्पर्धा यावर्षी पासुन भरविण्यात येणार आहे. ही स्पर्धा राजापूर तालुका मर्यादित असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. स्पर्धकांनी गणपती सजावटीचा एक मिनिटाचा व्हिडिओ बनवून पाठवायचा असून व्हिडिओचा दर्जा उत्तम असावा. व्हिडिओ पाठविण्याची अंतिम तारीख १४ सप्टेंबर आहे. बनविलेला व्हिडिओ
मनीष लिंगायत 8975762772,
प्रतीक मटकर7507259956,
सकलेन काझी 7057443334,
भाग्यश्री लाड 9146656339,
उमेश दळवी 9421142787,
गौरव नंदुरबारे9021711439,
अभिषेक पाथरे 7083770090,
प्रकाश फोडकर91685 11522
या नंबरवर पाठवायचा आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सरफराज काजी 9823606031 नंबरवर संपर्क साधावा. श्री गणेशाची १० सप्टेंबर रोजी प्रतिष्ठापना झाल्यानंतर १४ रोजी पर्यंत स्पर्धकांनी व्हिडिओ पाठविणे अनिवार्य आहे. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. कोरोनाचे सर्व शासकीय नियम पाळून तज्ञांद्वारे स्पर्धेचे परीक्षण करण्यात येणार आहे. या स्पर्धेतून उत्कृष्ट सजावटीसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय, तसेच 14 उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. तरी रत्नागिरीकरांनी बहुसंख्येने या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन सरचिटणीस राजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरफराज काजी यांनी केले आहे.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा