पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंगचा वापर अनिवार्य!

पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंगचा वापर अनिवार्य!
वृद्धेच्या मृत्यूस जबाबदार असल्याच्या आरोपांतून दुचाकीस्वाराची मुक्तता
मुंबई : पादचाऱ्यांनी रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगचा वापर करायला हवा, असे नमूद करत बेदरकारपणे मोटारसायकल चालवून एका वृद्ध महिलेच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरल्याच्या आरोपांतून न्यायालयाने एकाची निर्दोष सुटका केली.
पोलिसांच्या आरोपानुसार, २०१७ मध्ये चेंबूर येथे पूर्व द्रुतगती महामार्गाजवळ ६० वर्षांची महिला रस्ता ओलांडत होती. त्या वेळी आरोपी हेमंत हटकर याने बेदरकारपणे मोटारसायकल चालवत तिला धडक दिली. त्यात तिचा मृत्यू झाला. मात्र या महिलेने रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगचा वापर करायला हवा होता. किंबहुना द्रुतगती महामार्गावर झेब्रा क्रॉसिंग असेल तरच पादचाऱ्यांनी रस्ता ओलांडायला हवा, असे न्यायालयाने हटकर याची निर्दोष सुटका करताना नमूद केले. तसेच संबंधित महिलेचा हटकर याच्या मोटारसायकलची धडक बसून मृत्यू झाल्याचा पुरावा पोलिसांनी सादर केलेला नाही. मुळात हटकर याचा या अपघाताशी संबंध होता हेच पोलीस सिद्ध करू शकले नाहीत, असे महानगरदंडाधिकारी एस. एस. पारावे यांनी आदेशात म्हटले.
न्यायालयाने पंचनाम्याचाही दाखला दिला आहे. पंचनाम्याचा विचार करता मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या द्रुतगती महामार्गावर अपघात झाला तेथून पूर्वेकडे ३५ फूट अंतरावर एक पदपथ होता आणि १५ फूट अंतरावर रस्ता दुभाजकही होता. याचाच अर्थ मृत महिला मधूनच रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होती हे स्पष्ट होते, असेही न्यायालयाने म्हटले. त्याच वेळी अपघात घडला त्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग असल्याचा पुरावाही पुढे आलेला नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा