आमदार निरंजन डावखरे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर
आमदार निरंजन डावखरे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर
ठिकठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटप
रत्नागिरी प्रतिनिधी:
कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन डावखरे काल शनिवारपासून रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात भाजपा कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधण्याबरोबरच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व जिल्ह्यातील नवउद्योजकांच्या कंपन्यांना भेट देण्यात आली.
भाजपाचे खेड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी आमदार डावखरे यांनी संवाद साधला. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक व गरजेच्या वस्तूंचे वाटप केले. या वेळी या वेळी भाजपाचे शहराध्यक्ष अनिकेत कानडे, संघटन सरचिटणीस नागेश धाडवे, माजी नगराध्यक्ष आबा जोशी, ज्येष्ठ कार्यकर्ते दादा धामणकर, संजय बुटाला, राकेश पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. चिपळूण तालुक्याच्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. आमदार डावखरे आणि ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे यांच्या वतीने परांजपे मोतीवाले हायस्कूलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात निरंजन डावखरे यांनी विद्यार्थ्यांबरोबर संवादही साधला. या वेळी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, श्रीराम एज्युकेशनच्या सई वरवाटकर, नगरसेवक निशिकांत भोजने, तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर, शहराध्यक्ष आशिष खातू आदींची उपस्थिती होती.
लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर यांच्यातर्फे संचालित चिपळूण येथील एरोफिनिक्स एव्हिएशन अकादमीलाही आमदार डावखरे यांनी भेट दिली. तसेच कोरोना आपत्तीनंतर एव्हिएशन क्षेत्रातील आव्हाने व अडचणींबाबत माहिती घेतली. या वेळी अकादमीचे साहिल आरेकर, सुरज चव्हाण आदींची उपस्थिती होती.
आमदार डावखरे यांनी राजापुरातील भाजपा कार्यकर्त्यांशीही संवाद साधला. या वेळी तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, अॅड. सुशांत पवार, सुची ताम्हणकर, अनिल कनगुटकर, सिद्धार्थ जाधव आदींची उपस्थिती होती.त्यानंतर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. भाजपाच्या लांजा तालुका कार्यालयालाही श्री. डावखरे यांनी भेट दिली. तालुकाध्यक्ष महेश खामकर यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी शहराध्यक्ष प्रमोद कुरूप, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर, नगरसेवक मंगेश लांजेकर, संजय यादव सरचिटणीस राजेश सावंत, बाबा लांजेकर आदींची उपस्थिती होती. लांजा येथील पंडित दिनदयाळ हॉस्पिटलमध्ये ठाण्यातील डिकोटेक आयटी इंडस्ट्रिजने आयोजिक केलेल्या आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रम भेट देऊन प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या. या वेळी सुशीलकुमार मुळ्ये, नित्यानंद दळवी, मिराजी मुळ्ये, नगरसेवक मंगेश लांजेकर, डिकोटेकच्या व्यवस्थापकीय संचालक रेश्मा साळुंके आदींची उपस्थिती होती.
-----------------
फोटोओळी - चिपळूण येथील परांजपे मोतीवाले हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना आमदार निरंजन डावखरे. सोबत सुरेखा खेराडे, सिताराम राणे आदींची उपस्थिती होती.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा