रिलीफ फाउंडेशनने आंबेडच्या तिन्ही अंध मुलांची घेतली जबाबदारी



 रिलीफ फाउंडेशनने आंबेडच्या तिन्ही अंध मुलांची घेतली जबाबदारी


 त्या मुलांची  रिलीफ फाउंडेशनने  उद्योग धंद्यासाठी उभारी देणार

आंबेड येथे आर. सी. सी. दुकान गाळा बांधून देणारे

दुकानात आवश्यक साहित्य रिलीफ फाउंडेशन भरून देणार

रिलीफ फाउंडेशनच्या निर्णयाचे अनेकांनी केले स्वागत


रत्नागिरी प्रतिनिधी 

(रमजान गोलंदाज)


                   सामाजिक जीवनात काम करताना आम्ही समाजाचे काय तरी देणे लागतो या उद्देशाच्या भावानेतून रिलीफ फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात.अनेकांना त्यांनी मदतीचा हात पुढे केला असून संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बु. येथिल सलाउद्दीन बोट यांच्या ३ मुलांच्या  नशिबी आलेल्या अंधपनाची बातमी रिलीफ फाउंडेशन पर्यत पोचली त्याची दखल घेत रिलीफ फाउंडेशनच्या काही पदाधिकारी यांनी  सलाउद्दीन बोट यांच्या कुटुंबाला भेट दिली नेमकी परिस्थितीत काय आहे? त्या ३अंध मुलांना काय मदत करता येईल याची चौकशी केली. त्याची भेट घेतल्यावर त्यांना आर्थिक पाठबळ देत रोजगाराच्या दृष्ठीने विचार करून रिलीफ फाउंडेशनच्या माध्यमातून या तिन्ही मुलांना दुकान गाळा बांधून देण्यात येणार असल्याचे फाउंडेशनचे सिकंदर जसनाईक, हनीफ घंन्सर या प्रमुखानी जाहीर केले आहे.

                    जुनेद, जहीर, एजाज यांना काही लोकांनी मदत करतो म्हणून जाहीर केले व काही लोकांनी आश्वासन दिले. मात्र रिलीफ फाउंडेशनने त्यांची कहाणी जाणून घेऊन त्यांना आर्थिक रूपात मदत न करता कायम स्वरूपी त्यांना रोजगाराच्या दृष्टीकोनातुन मदत मिळावी यासाठी आंबेड येथे त्यांना आर. सी. सी  दुकान गाळा बांधून शाळेसाठी लागणारी स्टेशनरी, आयस्क्रीम विकण्यासाठी 2 फ्रिजर, लहान मुलांना लागणारी चॉकलेट, बिस्कीट अश्या अनेक वस्तूचे दुकान सलाउद्दीन बोट यांच्या मुलांना बांधून दिले जाणार असून त्यामध्ये लागणारे सर्व साहित्य रिलीफ फाऊंडेशन भरून देणार आहेत. त्यांच्या माध्यमातून या तिन्ही मुलांना उभारी देण्याचा धाडसी निर्णय रिलीफ फाउंडेशनने घेतला आहे. त्यांच्या माध्यमातून घेतलेली हा निर्णय या तिन्ही मुलांच्या पिढील आयुष्याचा मारक निर्णय ठरणा आहे. या मदतीमुळे कायम स्वरूपाचा रोजगार आणि आर्थिक मदतीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.रिलीफ फाउंडेशनच्या या धाडसी निर्णयामुळे अनेकांनी त्यांचे कौतुक केले असून अनाथाचे नाथ बण्याचे काम रिलीफने केले आहे.

              जहीर,एजाज, जुनेद यांना रिलीफ फाउंडेशनच्या मदतीमुळे जगण्याची आशा वाढली असून जे दिवस अंधारात गेले पण येणारे दिवस उजेडात आणण्याचे काम रिलीफ करणार आहे.त्याबबद्दल स्लाउद्दीन बोट व कुटुंबातील सर्वानी आभार मानले असून ही तिन्ही मुलं स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करतील हें निश्चित.

...................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org