दापोली कृषी विद्यापिठातील विद्यार्थिनींनी केले भातपिकावरिल रोग व त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन



 दापोली कृषी विद्यापिठातील विद्यार्थिनींनी केले भातपिकावरिल रोग व त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन


रत्नागिरी प्रतिनिधी:-

कोकणातील भातपिकावर अनेक किडी व रोग एकाच वेळी येण्याची शक्यता असते. करपा, कडा करपा, शेंडे करपा(पर्ण करपा), पर्णकोष करपा, आभासमय काजळी, तपकिरी ठिपके आणि उदबत्ता हे रोग प्रामुख्याने आढळून येतात. तसेच खोडकिडा, तपकिरी तुडतुडे, खेकडे, सुतळीतील अळी, लोंबीतील ढेकूण इत्यादी किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. कृषी महाविद्यालय, दापोली या महाविद्यालयातील बी.एस.सी.अँग्रीचे शिक्षण घेणाऱ्या शेवटच्या वर्षातील विदयार्थ्यांनींनी भातपिकावरील किडी व रोगांवर कसे नियंत्रण ठेवावे लागते, त्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयी शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले. भातपिकासाठी सुधारित जातींची निवड कशी करावी, तसेच माती परीक्षण , बीजप्रक्रिया, खतांचे योग्य व्यवस्थापन, जैविक पद्धतीने रोग नियंत्रण कसे करावे, किटकनाशक फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, विषबाधा झाल्यास कोणते प्रथमोपचार करावे या विषयीची माहिती विद्यार्थ्यांनीनी तक्ते आणि चित्रीकरणाच्या माध्यमातून उपस्थित शेतकऱ्यांना दिली. या कार्यक्रमाला गावचे अध्यक्ष रमेश खळे, नरेश खळे, विनायक ठोंबरे, विलास ठोंबरे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. कोकणातील शेतकरी भात पीक वर्षानुवर्षे घेत आहेत. त्याला भात पीकावर येणारे रोग आणि किडी या तर माहित असतात. पण रोग व किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शास्त्रकीयद्रुष्ट्या कोणत्या उपाययोजना कराव्यात हे माहित नसते. गावात प्रथमच अशा प्रकारची माहिती दिल्याबद्दल रमेश खळे यांनी कृषीकन्या ऐश्वर्या भेकरे, सिद्धी रसाळ, रिंकी खळे यांचेआभार मानले. असेच नवनवीन कार्यक्रम गावात आयोजित करावेत यासाठी विद्यार्थ्यांनींना प्रोत्साहन दिले.

...................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org