दापोली कृषी विद्यापिठातील कृषीकन्यांनी बचतगटातील महिलांना फळे व दूधापासून पदार्थ बनविण्याचे प्रात्यक्षिकातून दिले प्रशिक्षण

 



दापोली कृषी विद्यापिठातील कृषीकन्यांनी बचतगटातील महिलांना फळे व दूधापासून पदार्थ बनविण्याचे प्रात्यक्षिकातून दिले प्रशिक्षण


रत्नागिरी प्रतिनिधी:-

ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील चतुर्थ वर्षातील कृषीकन्यांनी महिला सबलीकरणाच्या उद्देशाने  बचतगटातील महिलांना फळे व दूधापासून पदार्थ बनविण्याचे प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण दिले. कोकणात विशिष्ठ हंगामात मोठ्या प्रमाणात खूप फळे उपलब्ध होतात. पण प्रक्रिये अभावी बरीचशी फळे वाया जातात. त्यामुळे फळांवर प्रक्रिया करून त्यांचे मूल्यवर्धन ही आजची गरज आहे. तसेच कोकणात दूग्धशाळेच्या अभावामुळे दूध आणि दूग्धजन्य पदार्थांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. त्यामुळे बचत गटातील महिलांना दूध आणि फळांवर प्रक्रिया करून नवनवीन पदार्थ तयार करून त्यांचे आर्थिक गणित सुधारुन महिला सबलीकरणास चालना मिळेल.

या प्रशिक्षण कार्यक्रमात कोकणात उपलब्ध होणाऱ्या फळ आणि दुधापासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कृषीकन्यांनी कोकम आगळ, तांदळाचे पापड, साबुदाणा पापड, बटाटा वेफर्स, मिरची-लिंबू लोणचे, पेरू जाम, दही, रसगुल्ला हे पदार्थ प्रात्यक्षिकासह करून दाखवले आणि उपस्थित महिलांकडून करून घेतले. 

या प्रशिक्षणाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना देर्दे गावातील महिला बचतगट सदस्या सौ. शैला ठोंबरे यांनी हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविल्याबद्द्ल कृषीकन्यांचे आभार मानले. तसेच गावामध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या फळ व दुधापासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्याची माहिती मिळाली आणि आम्ही महिला हे गावातच बनवू शकतो याबद्दल खात्री पटली. या प्रशिक्षणवर्गाच्या अत्यंत नेटक्या नियोजनपूर्वक व आयोजनासाठी विद्यार्थ्यांनींनीचे कौतुक केले. 

सन २०२१-२२ RAWE कार्यक्रमांतर्गत विद्यार्थीनी सिद्धी रसाळ, रिंकी खळे, ऐश्वर्या भेकरे यांनी हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला.

...................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org