आजची भावलेली कविता -शोध सुखाचा

 



आजची भावलेली कविता

शोध सुखाचा  

अरे  माणसा...
आयुष्य संपले तरी खऱ्या सुखाचा
 तुझा शोध संपला नाही...
कारण तू कोणत्या सुखाला कुठे शोधतोस?
श्रीमंतीच्या, धनाच्या आधारे फार 
तर क्षणिक भौतिक सुखे मिळतील...
मृगजळामागे धावून खरी तहान भागत नाही...
किंवा कोणत्याही बाजारपेठांत
 ते विकत घेता येत नाही...
कोणत्याही मंदिरातल्या मूर्तीत 
खरा देव भेटत नाही... ना...
त्याला अनुभवावंच लागतं....
तसं सुख हे मानण्याची, 
अनुभवण्याची गोष्ट आहे...

अरे माणसा...
उगाच तू वणवण फिरतोस ना.. चहूकडे... 
दिशाहीन झाल्या सारखा...
नैराश्याचे रूप घेऊन ....
दगडाच काळीज होऊन...
मनोकांक्षांना मारून ...
एकांतात अश्रुधारा वाहतय ना ..!

अरे माणसा!
नैराश्यात जाऊन कधीच
सुख समृद्धी मिळणार नाही...ना
कारण..
माणूस हा आशेवरच जगतो...
नैराश्याने फक्तं मिळेल ना दुःख...यातना...
या काळोखाच्या जीवनात..!

या अंध:कारमय जीवनातून 
सुटका करून घ्यायची असेल ना...
तर...
स्वयंप्रकाशित हो...
गौतमबुद्धाने सांगितलंच 
"अत्त दीप भव:"...
आधी स्वतः स्वतःला ओळख ...
अन् परिस्थितीला, परिवाराला...
चराचरात परमेश्वर शोध...
सगळ्यांना समजून घे...
उपेक्षितांना मदत कर!
आशा आकांक्षा सिमित ठेव...!

अरे माणसा.
आयुष्याच्या प्रवासात.. जीवनाच्या रणांगणात..
काट्यांना फुलापरी मोडले पाहिजे
पायी रक्ताची मेहंदी तरी 
चार पाऊलं .. चाललं पाहिजे..
यशाचं शिखर गाठण्यासाठी..!

अरे माणसा..!
योग्य सुखासाठी योग्य प्रयत्न केले ,
की अपेक्षित सुखाची सुरुवात होते...
फक्त सुरुवात केली पाहिजे...
नेहमी समाधानी राहिले पाहिजे...
समाधानातच सुख असते..
अन् इथेच खऱ्या सुखाचा शोध लागतो...!!

 ✍️
नितु..
(नितेश. शि. खरोले )
8329454924
रविंद्र विद्यालय/ महाविद्यालय चोपा.

टिप्पण्या