शब्द लहरी
शब्द लहरी
निसर्ग
निसर्गातील काही भाग म्हणजेच,आदिवासी, गावातील गरीब लोक जंगलातून फळे, फुले (रानमेवा) आणून विकतात. त्यांच्यावर त्यांचे पोट भरते.झाडे तोडून,वणवे लावून तुम्ही त्यांच्या पोटावर पाय ठेवत आहात. तुम्ही जंगलात वणवे लावता,हजारो छोटे मोठे प्राणी, पक्षी मारले जातात, त्यांना स्थलांतर करावे लागते. जर तुमचे घर कोणी विनाकारण पेटवून दिले तर तुम्हाला कसे वाटेल? या सर्वामुळे नकळत तुम्ही मानवी जीवन चक्र प्रभावित करत आहेत. तुम्ही स्वतःच्या हातांनी आपला विनाश करत आहात,हे लक्षात घ्या.आणि हे दृष्ट चक्र आता थांबवा.
सौ.प्रतिमा अरुण काळे
निगडी प्राधिकरण पुणे,४४
दिनांक :- ३/९/२०२१
----------------------------------------------------------------
ज्ञानेश्वरीतील सुंदर प्रतिमाने
ना तरी जाणिवेच्या आयषि ।
करिता दधी कडसणी । मग नवनीत
निर्वाणी । दिसे जैसे ।।
की भूस बीज एकवट । उपाणिता
राहे धनवट । तेथ उडे ते फलकट ।
जाणो आले ।।
तैसे विचारिता निरसले । ते
प्रपंचू सहज सांडवले । मग तत्वता
तत्व उरले । ज्ञानियासि ।।
किंवा बूद्धीच्या चातुर्याने दही
घुसळले असता शेवटी जसे सारभूत
लोणी निघालेले द्रुष्टीस पडते .
अथवा एकत्र असलेले कोंडा व
धान्य वाऱ्यावर धरून उफणल्यावर
ज्याप्रमाणे खाली निव्वळ धान्य जागेवर रहाते व उडून जाते ते
फोलपट असे समजून येते.
त्या प्रमाणे विचाराच्या अंती ज्याचा
भ्रमनिरास च होतो तो प्रपंच ज्ञानी
पुरूषांकडून सहज टाकला जातो.
मग या ज्ञानी पुरुषाला विचार करण्याला फक्त त्रिकालाबाधित असे
तत्त्व अर्थात ब्रह्मच उरते .
सौ. शैलजा जाधव (पाटील)
चांदवड नासिक

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा