वन्य प्राण्यांच्या अवयव तस्करी प्रकरणी एकास अटक


कोल्हापूर  : वन्य प्राण्यांच्या अवयव तस्करी प्रकरणी एकास अटक

वन्य प्राण्यांच्या अवयव तस्करी प्रकरणी एकास अटक


वाघ, बिबट्याची नखे, एका वन्य प्राण्याचे हृदय व एक बंदूक हस्तगत


कोल्हापुर जिल्ह्यातील भुडरगड तालुक्यातील मौजे शिवडाव येथे आज सकाळी १२ वाजता गुप्त माहित्याच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत, तेथील माजी पोलीस पाटील वसंत महादेव वासकर(वय-५५) यांच्या राहत्या घरी मारलेल्या छाप्यात वाघ, बिबट्याची नखं व एका वन्य प्राण्याचे हृदय हस्तगत करण्यात आले. या शिवाय शिकारीसाठी वापरलेली बंदूक देखील  हस्तगत करण्यात आली आहे.

याप्रकरणी आरोपी वसंत महादेव वासकर यास अटक करण्यात आलेली आहे. आरोपी याने तीन नखं घरातील स्वयंपाक घरात हळदीच्या डब्यात लपवून ठेवले होते, तर दोन नखं त्याने एकास विकले आहेत. एवढच नाही तर एका वन्यप्राण्याचे हृदय त्याने चक्क फ्रीज मध्ये लपवून ठेवले होते. याचबरोबर, त्याच्या घरात एक बंदूक देखील जप्त करण्यात आली आहे.
सदर आरोपीने यापूर्वी असे अनेक कारनामे स्वतः कडे असलेल्या जीप व बंदुकीच्या मदतीने केले असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

कोल्हापूर परिक्षेत्र मुख्य वन संरक्षक डॉ.व्ही क्लेमेंट बेन यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाईमध्ये सहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, वनक्षेत्रपाल फिरते पथक युवराज पाटील, मानद वन्यजीव रक्षक सातारा तथा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक सांगली अजितकुमार पाटील व वनविभागाचे इतर वनपाल, वनरक्षक हे सहभागी झाले होते. अधिक तपास सहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे करीत आहेत.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या