आजची भावलेली कविता-एक आई अशी ही...




 आजची भावलेली कविता

एक आई अशी ही...

एक आई अशी ही
वयाने वाढलेली
पण मनाने अजूनही 
भोळी भाबळी सानुली....

एकच आवड तिलाही
इतर स्त्रिसारखी आई होण्याची
मनाशी एकच इच्छा धरून
संघर्ष करते बाळ जन्म देण्याची..

तिचे एकच म्हणणे की
निसर्गाने दिलेले वरदान
दिले संपूर्ण नारी जातीला
मग हिरावला का? माझा मान

अजूनही जिवंत आहे 
माझा शरीरात मातृत्वाचं अंग
वय वाढले म्हणून काय झालं
मनसोक्त खेळीन  मी बाळा संग

हे  विधात्या ? हे निसर्गा
कर तू माझ्यात  बदल काही
होईन मी एका बाळाची आई
सांगेन समाजाला मीही वांझोटी नाही....

खुप सहन केले आज पर्यंत
जीव घेण्या संघर्ष खूप सोसले
बेगडी मुखवटे या समाजाचे
लिहितांना ही नयनी अश्रू दाटले

संगिता रामटेके गडचिरोली

टिप्पण्या