नियम मोडण्यात राजकीय पक्षांमध्ये चढाओढ
नियम मोडण्यात राजकीय पक्षांमध्ये चढाओढ
निर्बंध फक्त कागदावर; करोना नियमांचा बागुलबुवा सर्वसामान्यांसाठीच
महाराष्ट्र:सर्वसामान्यांना नियमावलीचे पालन करा असे सांगणारे मंत्री, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, विरोधक यांच्याकडून करोनाविषयक नियम सर्रास खुंटीवर टांगण्यात येत आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या नेतृत्वाखालील जन आशीर्वाद यात्रा असो वा त्यांच्या पक्षाचे आंदोलन, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीतील शेतकरी मेळावा असो किं वा खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीतील कार्यकर्ता मेळावा. काँग्रेसचे महागाई विरोधातील आंदोलन असो किं वा काही दिवसांपूर्वी मनसेकडून अमित ठाकरे यांच्या स्वागताप्रसंगी झालेली गर्दी. करोनाविषयक नियम मोडण्यात जणूकाही शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, मनसे या सर्व राजकीय पक्षांमध्ये चढाओढच लागली आहे.
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेनेशी उफाळलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपने नाशिक शहरातही जन आशीर्वाद यात्रा काढली. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शक्तिप्रदर्शन करण्यात आले. मुखपट्टीविना अनेक जण वावरत होते. सुरक्षित अंतराचे पथ्य पाळले गेले नाही. यात्रेत गर्दी जमविल्याप्रकरणी पोलिसांनी भाजप शहराध्यक्षांविरोधात गुन्हा दाखल के ला गेला.
नियमावली धाब्यावर बसविण्यात सत्ताधारी शिवसेनाही मागे नाही. कार्यकर्ता मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी मार्गदर्शन केले. आकाराने लहान असणाऱ्या सभागृहात मोठय़ा संख्येने शिवसैनिक जमले. मुखपट्टी, सुरक्षित अंतर अनेकांच्या गावी नव्हते. नारायण राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर सेना-भाजपमध्ये धुमश्चक्री उडाली होती. परस्परांविरोधात आंदोलन झाली. तेव्हांही कोणी करोनाचे नियम पाळले नाहीत. आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले. शाखाध्यक्ष निवडीसाठी मनसेचे अमित ठाकरे, संदीप देशपांडे, माजी आमदार बाळा नांदगावकर आदींनी दोन दिवसांत ८०० ते हजार जणांच्या मुलाखती घेतल्या. राष्ट्रवादीच्या आंदोलन आणि बैठकांमध्ये वेगळे चित्र नव्हते. नियम मोडणाऱ्यांमध्ये काँग्रेसचीही भर पडली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जनजागृती परिषदेत शेकडो शेतकऱ्यांसमोर भाषण केले.
काँग्रेसचे शरद आहेर यांनी सर्वपक्षीय शेतकरी आंदोलनास पोलीस परवानगी घेण्यात आल्याचे नमूद केले. जनजागृती परिषदेत नियमावलीचे पालन झाल्याचा दावा त्यांनी केला. पंतप्रधान आपल्या मंत्र्यांना जनआशीर्वाद यात्रा काढण्यास सांगतात. तिथे गर्दी जमते. त्यांच्याकडून गांभीर्याने नियम पाळले जात नसतील तर सामान्य कार्यकर्त्यांकडून कशी अपेक्षा करणार, असा प्रश्न आहेर यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी करोनाचे नियम सर्वानीच पाळले पाहिजे याबद्दल दुमत नसल्याचे मान्य केले. पक्षीय बैठकांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून राष्ट्रवादीने विभागवार बैठक घेतल्याचा दाखला त्यांनी दिला. मुखपट्टीचे बंधन सर्वाना कटाक्षाने पाळायला लावल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सर्वच राजकीय पक्षांकडून करोना नियमावलीचे उल्लंघन होत आहे. याबाबत गुन्हे दाखल होतात. पण भाजपला सावत्र वागणूक दिली जाते. ७० वर्षांत नाशिकला पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिपद मिळाले. जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी यात्रा काढण्यात आली. सेवा हे संघटन हे आमचे ब्रीद आहे. त्यामुळे कितीही गुन्हे दाखल झाले तरी हरकत नाही. भाजप जनतेसाठी आंदोलन करीत आहे.
– गिरीश पालवे (शहराध्यक्ष, भाजप)
करोना नियमांच्या उल्लंघनप्रकरणी शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना वेगळा न्याय लावता जातो, या आक्षेपात तथ्य नाही. दुसरी बाब म्हणजे खा. संजय राऊत यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात बैठक झाली. पक्षांतर्गत बैठकीसाठी परवानगीची गरज नसते. या बैठकीत सर्व पदाधिकारी, शिवसैनिकांनी मुखपट्टी, सुरक्षित अंतराचे नियम पाळले.
– सुधाकर बडगुजर (महानगरप्रमुख, शिवसेना)
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment