दिवा-सावंतवाडी, दिवा-रत्नागिरी पॅसेंजर गाड्या सुरु केल्याबद्दल कडवई ग्रामस्थांनी मानले खासदार श्री.विनायकजी राऊत यांचे आभार..

 


दिवा-सावंतवाडी, दिवा-रत्नागिरी पॅसेंजर गाड्या सुरु केल्याबद्दल कडवई ग्रामस्थांनी मानले खासदार श्री.विनायकजी राऊत यांचे आभार..

  

चिपळूण रत्नागिरी:कोरोनामुळे दिवा – सावंतवाडी व दिवा रत्नागिरी पॅसेंजर गाड्या सुरु नसल्यामुळे सामान्य नागरिकांना स्पेशल एक्सप्रेसच्या नावाखाली मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे. त्याबद्दल खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री मा.ना.श्री. अश्विनी वैष्णव यांच्याकडे पॅसेंजर गाड्या चालू कराव्यात याची मागणीही केली होती. आज गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी रत्नागिरी दिवा पॅसेंजर, रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर, सावंतवाडी-दिवा पॅसेंजर, मडगाव-सावतंवाडी पॅसेंजर या गाड्या 7 ते 30 सप्टेंबर या कालावधीत धावणार आहेत. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे फेस्टीव्हल स्पेशल गाड्या सोडणार आहे. गेले अनेक दिवस बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या फेस्टिव्हल स्पेशल नावाने 7 ते 30 सप्टेंबर दरम्यान सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे आज चिपळूण दौऱ्यावर खासदार विनायक राऊत आले असता त्यांनी कडवई रेल्वे स्थानक येथे भेट दिली असता ग्रामस्थांनी सर्वसामान्य चाकरमन्यांच्या हिताचा निर्णय घेतला त्याबद्दल अभिनंदन करुन त्यांचे आभार मानले. तसेच कडवई रेल्वेस्थानक येथे प्लॅटफॉर्म व्हावे व तुतारी एक्सप्रेस ट्रेनला थांबा मिळावा अशी ग्रामस्थांनी विनंती केली.


यावेळी त्यांच्यासोबत चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री बाळा कदम जि प माजी अध्यक्ष श्री संतोष थेराडे तालुकाप्रमुख श्री संदीप सावंत जिल्हा परिषद सदस्य श्री शंकर भुवड  माजी सभापती श्री दिलीप शेठ सावंत विभागप्रमुख श्री अनंत उजगावकर उपविभाग प्रमुख श्री दत्ताराम लाखन उपविभाग प्रमुख श्री अरविंद जाधव उपविभाग प्रमुख प्रदीप चव्हाण सरपंच सौ विशाखा ताई कुवळेकर श्री विजय कुवळेकर शाखाप्रमुख श्री संदेश सागवेकर श्री सुचित पंडव श्री रवींद्र येलोंडे ग्रामपंचायत सदस्य श्री रामचंद्र हरेकर श्री आप्पा फडकले श्री कुंभार संजय उजगावकर पंडव गावकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

...................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org