पो.अंमलदार. रत्नाकर शिंदे यांचे अपघाती निधन

 



पो.अंमलदार. रत्नाकर शिंदे यांचे अपघाती निधन


बंदुकीच्या तीन फायरी हवेत झाडून पोलीस पथकाने दिली मानवंदना


   उस्मानाबाद: पारा (राहुल शेळके ):वाशी तालुक्यातील पिंपळगाव कोठावळा येथील मूळ रहिवासी असलेले पोलीस अधीक्षक कार्यालय / बिनतारी संदेश विभाग उस्मानाबाद येथे कार्यरत असलेले पोलीस अंमलदार / कर्मशाळा मदतनीस रत्नाकर ज्ञानोबा  शिंदे वय 55 वर्ष यांचा येडशी टोल नाक्याजवळ मोटर सायकल वरून जात असताना दीड महिण्यापुर्वी अपघात होऊन शिंदे यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यांच्यावर सोलापूर येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरु होते. सोमवारी सकाळी (दि.6)अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी पिंपळगाव (को ) येथे  अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यांच्या पश्चात  पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली असा त्यांचा परिवार आहे.त्त्यांच्या जाण्याने संपूर्ण गावावर शोकाकळा पसरली आहे.

             अंत्यसंस्काराचा वेळी बिनतारी संदेश विभागातील पोलीस निरीक्षक सचिव पिठे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर कोळसुरे , विवेकानंद आर्य,पोलीस हवालदार प्रमोद गालफाडे, पोलीस अंमलदार भीमा गाढे,पंचय्या स्वामी हे होते. 

      यावेळी वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ,हवालदार सुभाष तांबडे जमादार मोहसीन खान पठाण, पोलीस अंमलदार नवनाथ सुरवसे, चालक वाघचौरे तसेंच पोलीस हवालदार रवी गंगावणे यांच्या शोकसलामी पथकाने हवेत बंदूकीच्या तीन फायरी झाडून पोलीस मानवंदना दिली.


...................................
------------------------------

www.freshnewz.in

Comments