अडखळ ते मंडणगड या दरम्यान अतिसंरक्षित खैर वृक्षांची तोड करुन त्याची वाहतूक करणारी गाडी पोलिसांनी पकडली, एकूण १ लाख ५ हजार रुपये किंमतीचा माल जप्त

 

अडखळ ते मंडणगड या दरम्यान अतिसंरक्षित खैर वृक्षांची तोड करुन त्याची वाहतूक करणारी गाडी पोलिसांनी पकडली, एकूण १ लाख ५ हजार रुपये किंमतीचा माल जप्त


रत्नागिरी प्रतिनिधी:-

रत्नागिरी जिल्ह्यातील अडखळ ते मंडणगड या दरम्यान अतिसंरक्षित खैर वृक्षांची तोड करुन त्याची वाहतूक करणारी गाडी पोलिसांनी पकडली असून एकूण १ लाख ५ हजार रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दिनांक 31 ऑगस्ट रोजी केली. या घटनेतील आरोपी प्रमोद विठोबा सुर्वे, वय 30, रा.विसापूर, मोरेवाडी, ता.दापोली, जिल्हा रत्नागिरी व नजिर बालमिया कडवेकर, वय 30, रा.विसापूर पातरी, ता.दापोली, जिल्हा रत्नागिरी यांनी एकमेकांच्या संगनमताने आपल्या ताब्यातील अॅपे टेंपो मधून 10 हजार रुपये किंमतीच्या खैराच्या साली काढलेले लहान मोठे ओंडके चोरी करुन विनापरवाना वाहतूक करत असताना वाहन चालविण्याचा परवाना नसताना शासनाचे शुल्क चुकवून अडखळ ते मंडणगड या ठिकाणी चोरटी तस्करी करित असताना मिळुन आले. यासंदर्भात मंडणगड पोलिस स्थानकात गुन्हा रजिस्टर नंबर 44/2021 मध्ये भा.दं. वी. कलम 379, 34, भारतीय वन कायदा 1927 चे कलम 26(1)(अ)(फ), 42(2)(ख) 42 सह महाराष्ट्र वन नियमावली कलम 81 व मोटार वाहन कायदा कलम 3/181 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेची फिर्याद पोलिस कॉंस्टेबल महेंद्र राजेंद्र तांदळे यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस हेडकॉंस्टेबल बाणे करित आहेत.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या