आजचे भावलेले शब्द - निसर्ग

                                                                                  

                                    आजचे भावलेले शब्द

 निसर्ग

निसर्गातील वनस्पती,झाडे, वेली या ही आपल्यासारखे सुद्धा सजीव आहेत.त्यांनाही भावना आहेत, त्यांनाही वेदना होतात. आपल्या मुलांना, प्रियजनांना थोडेसे खरचटले की आपल्या मनाची घालमेल होते. पण झाडाच्या फांद्या तोडताना, फळांसाठी दगड मारताना, करवतीने, कुऱ्हाडीने वृक्षांना कापताना आपल्याला काहीच कसे वाटत नाही? डोळ्यात अश्रू नाही पण मनात एक साधा विचार हि येत नाही, एवढे अमानुष कसे झालो आपण?यावर विचार करणे गरजेचे आहे.आपल्या प्रमाणे इतरांना ही जीवन असते ही भावना आपल्याजवळ आली की सगळ्या गोष्टी सुरळीत होईल.

✍️

सौ.प्रतिमा अरुण काळे

निगडी प्राधिकरण पुणे,४४


Comments