मासे पकडताना तरुण गेला वाहून; ३० तासानंतर सापडला मृतदेह!
मासे पकडताना तरुण गेला वाहून; ३० तासानंतर सापडला मृतदेह!
- मासे पकडण्यासाठी गेल्यानंतर तरुण पाण्यात बुडाला
- सोमवारी सायंकाळी उशिरा खाडीकिनारी आढळला मृतदेह
- घटनेप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू
मंडणगड: तालुक्यातील म्हाप्रळ कुंभार्ली येथील एक इसम रविवारी दुपारी मासे पकडण्यासाठी गेल्यानंतर पाण्यात बुडाला. त्याचा मृतदेह सोमवारी सायंकाळी उशिरा म्हाप्रळ खाडीकिनारी आढळला आहे. अंकुश वसंत वाघमारे असं ४० वर्षीय मृत व्यक्तीचं नाव आहे.
रविवारी १९ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता सावित्री नदीच्या खाडी किनारी आंबेत म्हाप्रळ पुलाच्या डाव्या बाजूस असलेल्या खाजणात मासे पकडण्याचे काम सुरू होते. तेव्हा अंकुश वाघमारे यांनी अचानक पाण्यात उडी घेतल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर ते पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले.
हा इसम अचानक पाण्यात उडी मारुन गायब झाल्याने ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आणि शोधाशोध सुरू केली. मात्र २० सप्टेंबर सोमवारी सायंकाळी उशिरा खाडीकिनारी अंकुश वाघमारे यांचा मृतदेह आढळला आहे. तब्बल ३० तर तासानंतर मृतदेह शोधण्यात ग्रामस्थ व पोलीस यंत्रणेला यश आलं. दरम्यान, या घटनेप्रकरणी अधिक तपास मंडणगड पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गफार सय्यद करत आहेत.
................
------------------------------
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment