नळपाणी योजनेसाठी खोदलेल्या चरात गाडी अडकली
नळपाणी योजनेसाठी खोदलेल्या चरात गाडी अडकली
रत्नागिरी : शहरातील नळपाणी योजनेत होत असणारा विलंब आणि या कारणास्तव खोदण्यात आलेले रस्ते यामुळे नागरिक प्रचंड संतापले आहेत. मुसळधार पावसात व रात्रीच्या वेळी वाहन चालवणे हे अत्यंत धोक्याचे बनत चालले आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर खोदलेल्या खड्ड्यांमुळे यापूर्वी देखील अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. आज मारुती मंदिर जवळील बँक ऑफ इंडिया जवळील मुख्य रस्त्यावर अशाच एका खड्ड्यात गाडी अडकली आहे. रस्त्यांवर खोदून ठेवलेले हे खड्डे अत्यंत धोक्याचे ठरत असून रात्रीच्या वेळी एखाद्या दुचाकीस्वाराचा यामुळे जीव देखील जाऊ शकतो इतके हे धोकादायक आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्यावर खोदून ठेवलेले चर त्वरित बुजवावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा