राष्ट्रवादी, भाजपच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

 

राष्ट्रवादी, भाजपच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

 

राष्ट्रवादी, भाजपच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश


कर्जत: कर्जत तालुक्यामध्ये राष्ट्रवादी, भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तालुकाप्रमुख बळीराम यादव यांच्या पुढाकाराने या दोन्ही पक्षातील युवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करत शिवबंधन बांधले आहे.

राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे कर्जत तालुक्यातील शिंदे येथे शिव संवाद घोंगडी बैठक यासाठी आले होते. या वेळी कर्जत तालुक्यातील सिद्धटेक आणि कुळधरण येथील भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक तोरणांनी मंत्री गडाख यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे उत्तर नगर जिल्ह्यचे प्रमुख रावसाहेब खेवरे, दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, तालुकाप्रमुख बळीराम अण्णा यादव, माजी तालुकाप्रमुख बिभीषण गायकवाड, कर्जत शहर प्रमुख अक्षय तोरडमल, उपतालुका प्रमुख सुभाष जाधव, ज्येष्ठ शिवसेना नेते चंद्रकांत घालमे, विभाग प्रमुख पोपट धनवडे, अक्षय घालमे, पौरूष जाधव यांच्यासह तालुक्यातील शिवसेनेचे अनेक मान्यवर त्याचप्रमाणे सरपंच उपसरपंच सेवा संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य या वेळी उपस्थित होते.

या वेळी सिद्धटेक येथील सूरज परदेशी, तर कुळधरण येथील भाऊ गुंड सचिन सुपेकर, समाधान जगताप, अक्षय सुपेकर, किरण सुपेकर, अक्षय भवाळ,  सूरज गजरमल, सागर शिंदे, रवी काळे, महादेव गजरमल यांच्यासह अनेक युवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

शंकराव गडाख म्हणाले,की करोनामुळे मोठे कार्यक्रम घेता येत नसले तरीदेखील शिव संवाद घोंगडी बैठक यादेखील प्रभावी होत आहेत. राष्ट्रवादी व भाजपमधील अनेक कार्यकर्त्यांंनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांचे मी स्वागत करतो. आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व निवडणुकीत शिवसेना सर्व ताकद पणाला लावून त्या जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

नगर दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी म्हणाले की, राज्यामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, त्यांच्या मार्फत मी शेतकरी सर्वसामान्य जनता नागरिक यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. तसेच शिवसैनिकांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अशा पद्धतीने राज्यात प्रथमच शिव संवाद घोंगडी बैठकांचे आयोजन शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांनी केले आहे आणि त्याला सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रास्ताविक माजी तालुका अध्यक्ष बिभीषण गायकवाड यांनी केले. तर सूत्रसंचालन  पोपट धनवडे व पौरूष जाधव यांनी केले.


................................
------------------------------

www.freshnewz.in

Comments