साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी आशुतोष काळे

साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी आशुतोष काळे
देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान असलेल्या श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या नेमणुकीचा तिढा अखेर २१ महिन्यांनंतर सुटला.
राज्य सरकारने काल रात्री उशिरा साईसंस्थानच्या १७ विश्वस्तांपैकी १२ जणांची यादी जाहिर केली. आज शुक्रवारी या १२ सदस्यांपैकी अध्यक्षांसह ११ सदस्यांनी शिर्डीत येऊन साईमंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले. तसेच नंतर कार्यालयात जात पदभार स्वीकारला. काळे यांच्यासह नगराध्यक्ष तथा पदसिद्ध विश्वस्त शिवाजी गोंदकर, महेंद्र शेळके, सुरेश वाबळे, सुहास आहेर, सचिन गुजर,अनुराधा आदीक,डॉ एकनाथ गोंदकर,अविनाश दंडवते,राहुल कनाल, जयंत जाधव यांचा पदभार स्वीकारणाऱ्यांमध्ये सहभाग होता.
देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान असलेल्या श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या नेमणुकीचा तिढा अखेर २१ महिन्यांनंतर सुटला. यामध्ये संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद सेनेकडे आले. यानुसार उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नेमणूक झालेली आहे. मात्र पदभार स्वीकारण्यास आज ते अनुपस्थित होते. या मुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. मागील विश्वस्त मंडळात देखील सेनेचे सर्व सदस्य सतत गैरहजर राहिल्याने पुढे ते अपात्र ठरले होते. त्यामुळे आता शिवसेनेची या विश्वस्त मंडळाबाबतची पुढील भूमिका काय असणार याकडे लक्ष वेधले आहे.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment