रत्नागिरी जिल्हा कोतवाल संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी राजापूरचे कोतवाल आनंद आंबोळकर यांची निवड

 


रत्नागिरी जिल्हा कोतवाल संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी राजापूरचे कोतवाल आनंद आंबोळकर यांची निवड


राजापूर महसूल कर्मचारी संघटना, तलाठी संघटना व कोतवाल संघटनेच्या वतीने अभिनंदन


रत्नागिरी प्रतिनिधी:-

रत्नागिरी जिल्हा कोतवाल संघटनेची बैठक नुकतीच संपन्न झाली असून या संघटनेचा जिल्हा उपाध्यक्षपदी राजापूरचे कोतवाल आनंद आंबोळकर यांची निवड झाली आहे. आनंद आंबोळकर हे 2009 सालापासून राजापूर तहसील कार्यालयातील तलाठी सजा मध्ये कोतवाल म्हणून कार्यरत आहेत. ते सन 2016 ते 2019 या कालावधीत राजापूर तालुका कोतवाल संघटनेच्या खजिनदारपदी कार्यरत होते. तसेच सन 2019 ते 2021 या कालावधीत ते रत्नागिरी जिल्हा कोतवाल संघटनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदावर कार्यरत होते. रत्नागिरी जिल्हा कोतवाल संघटनेची बैठक रत्नागिरी येथे नुकतीच पार पडली असून या संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी आनंद आंबोळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल राजापूर महसूल कर्मचारी संघटना, तलाठी संघटना व कोतवाल संघटनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी महसुल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मंगेश परांजपे, उपाध्यक्ष शंकर घडशी, सरचिटणीस विकास पिठलेकर, तलाठी संघटनेचे अध्यक्ष संदीप कोकरे, सरचिटणीस सयाजी पवार, कोतवाल संघटनेचे अध्यक्ष मुराद हेटावकर आदी उपस्थीत होते.

....................................
------------------------------

www.freshnewz.in


Comments