‘ईडी’च्या समन्सविरोधात अनिल देशमुख उच्च न्यायालयात

 

‘ईडी’च्या समन्सविरोधात अनिल देशमुख उच्च न्यायालयात

‘ईडी’च्या समन्सविरोधात अनिल देशमुख उच्च न्यायालयात

‘ईडी’ने देशमुख यांना आतापर्यंत पाच वेळा समन्स बजावले असून ते एकदाही चौकशीसाठी हजर झाले नाहीत.


मुंबईबाहेरील ‘ईडी’ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या विशेष तपास पथकाकडे प्रकरणाचा तपास सोपवण्यात यावा, सर्वोच्च न्यायालयाने अन्य एका प्रकरणात दिलेल्या निर्देशांनुसार तपासावर देखरेख ठेवावी आणि आपली उपस्थिती व जबाब ऑनलाइन पद्धतीने नोंदवण्यात यावी, अशी मागणीही देशमुख यांनी के ली आहे.

‘ईडी’ने देशमुख यांना आतापर्यंत पाच वेळा समन्स बजावले असून ते एकदाही चौकशीसाठी हजर झाले नाहीत. कायद्यानुसार उपलब्ध पर्यायांचा विचार करत असल्याचा दावा करत देशमुखांनी हजर राहण्यास नकार दिला होता.

भ्रष्टाचाराचा आणि पदाचा दुरुपयोग केल्याच्या आरोपाप्रकरणी सीबीआयने देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ‘ईडी’नेही आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी देशमुख यांच्याविरोधात तपास सुरू केला. त्याचाच भाग म्हणून ‘ईडी’ने देशमुख यांना समन्स बजावत चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते. मात्र देशमुख यांनी समन्सविरोधात आधी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत अटकेपासून संरक्षणाची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार देत कायद्याने उपलब्ध असलेले अन्य पर्याय अवलंबण्याची सूचना दिली होती. त्याचाच भाग म्हणून देशमुख यांनी ‘ईडी’च्या समन्सविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

आरोप काय ?

राज्याचे गृहमंत्री असताना देशमुख यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला. तसेच बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना मुंबईतील रेस्टॉरंट आणि बारमालकांकडून १०० कोटी रुपये जमा करायला सांगितले होते. वाझे याने ४.७० कोटी रुपये वसूल केले होते. देशमुख यांच्या कुटुंबीयांचे वर्चस्व असलेल्या नागपूरस्थित श्री साई शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हे पैस वसूल करण्यात आले.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या