उपाहारगृहे, ढाबे पूर्वपदावर

 

उपाहारगृहे, ढाबे पूर्वपदावर

उपाहारगृहे, ढाबे पूर्वपदावर


करोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतचे उपाहारगृह आणि ढाब्यांचा व्यवसाय पूर्वपदावर येऊ लागला आहे.


हजारो कामगारांना पुन्हा रोजगार; व्यवसाय पुन्हा तेजीत


करोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतचे उपाहारगृह आणि ढाब्यांचा व्यवसाय पूर्वपदावर येऊ लागला आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायावर अवलंबून असलेल्या ५०००हून अधिक कामगारांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. महामार्गालगतच्या उपाहारगृहांमध्ये स्थानिक कामगारांची संख्या अधिक असल्याने त्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांचे जीवन पूर्वपदावर आले आहे. शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी मुंबई, गुजरात तसेच परिसरातून येणाऱ्या पर्यटक, उद्योजक तसेच वाहतूकदारांमुळे ठप्प झालेला व्यवसाय पुन्हा तेजीत आला आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसई ते आच्छाडदरम्यान दोन्ही वाहिन्यांवर १५००हून अधिक लहान-मोठे हॉटेल, ढाबे, टपऱ्या आहेत. तारांकित हॉटेलबरोबरच छोटे मोठे रेस्टॉरंट, उपाहारगृहे, खानावळी यांची संख्याही मोठी आहे. तेथे काम करणाऱ्या कामगारांची संख्याही मोठी आहे. यामध्ये इतर राज्याबरोबरच महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेले कामगार कार्यरत आहेत.

संचारबंदीमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत आला होता. कामगारांचा पगार आणि इतर सर्व खर्च मात्र कायम असल्याने हॉटेल सुरू ठेवणे अवघड झाले होते. उपहारगृहचालकांना स्वयंपाकीसह इतर कर्मचारीही सांभाळणे आवश्यक असल्याने त्यांचे पगार, वीज व पाणी देयके, भाडे, देखभाल खर्चही भरावा लागत आहे. त्यामुळे उत्पन्नाच्या तुलनेत खर्च वाढल्याने व्यवसाय डबघाईला आला होता.  मात्र निर्बंध शिथिल झाल्याने हॉटेल आणि ढाबे व्यवसाय पूर्वपदावर आले आहेत. त्यामुळे कामगार तसेच हॉटेल व्यावसायिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

टाळेबंदीनंतर धाबे व्यवसाय सुरळीत सुरू झाल्याने स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कामगारांचा पगार, वीज देयके आदी खर्च काढून व्यवसाय पूर्वपदावर येतो आहे.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

Comments