रत्नागिरीतील सावकाराकडून कर्ज घेतले, ते फेडले, पण नंतर पुन्हा पैशासाठी धमक्या सुरु झाल्या


रत्नागिरीतील सावकाराकडून कर्ज घेतले, ते फेडले, पण नंतर पुन्हा पैशासाठी धमक्या सुरु झाल्या

 

रत्नागिरीतील भाटीमी-या येथील रिक्षाचालक महेश पंढरीनाथ चव्हाण यांची जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे तक्रार


रत्नागिरी प्रतिनिधी:-

रत्नागिरी शहरातील बैलबाग परिसरातील एका सावकाराकडून व्याजी पैसे घेतले. काही काळानंतर व्याजासहीत पैसे परत केले. परंतू पैसे परतफेड केल्यानंतरही सावकाराकडून पैशाची मागणी सुरु झाली. धमक्यांचे फोन सुरु झाले. कुटुंबियांच्या जिविताला व मालमत्तेला धोका पोचावण्याच्या गोष्टी हा सावकार करत असून या सावकाराकडून संरक्षण द्या अशी मागणी रत्नागिरीतील भाटीमी-या येथील रिक्षाचालक महेश पंढरिनाथ चव्हाण यांनी रत्नागिरी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे केली आहे. तशा आशयाचा लेखी तक्रार अर्ज त्यांनी सादर केला आहे. 

महेश पंढरिनाथ चव्हाण हे गेली वीस वर्षे रिक्षा व्यवसाय करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे रिक्षा व्यवसाय ठप्प झाला. गेल्या दिड वर्षात उत्पन्न नाही. कुटुंबियांचे दागिने गहाण ठेवून उदरनिर्वाह करावा लागला. आर्थिक चणचण सतत भासत होती. या कारणास्तव चव्हाण यांनी एका सावकाराकडून प्रतिमहा १५ टक्के व्याजदराने कर्ज घेतले. सावकाराने १०० रु.च्या को-या बॉन्ड पेपरवर सह्या करुन घेतल्या. चव्हाण यांनी व्याजासहित पैसे परत केले. मात्र एकही पावती मिळाली नाही. तसेच दुस-या एका सावकाराकडून पैसे घेतले. तिथेही पैसे फेडले. मात्र पावत्या दिल्या गल्या नाहीत. या सावकाराकडून किडण्या विकुन पैसे फेडण्यात यावेत असा सल्ला देण्यात आला. 

त्यामुळे या दोन्ही सावकारांविरुद्ध माझी फिर्याद आहे. या सावकारांकडून माझ्या कुटुंबियांच्या जिवितास व मालमत्तेस धोका आहे अशा आशयाचे पत्र महेश पंढरिनाथ चव्हाण यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयास सादर केले आहे.

...................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org