चेअरमन निवेंडकर यानी शाखेमधून घेतलेले कर्ज थकित
चेअरमन निवेंडकर यानी शाखेमधून घेतलेले कर्ज थकित
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष परशुराम तुकाराम निवेंडकर यांची दि.०२/०४/२०२१ रोजी संपन्न झालेल्या चेअरमन पदाच्या निवडणूकीत चेअरमन पदी निवड झाली आहे. परशुराम तुकाराम निवेंडकर हे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माळनाका शाखेचे खातेदार असून त्यांनी सदर शाखेमधून घेतलेले कर्ज थकित आहे. अशा आशयाची एक तक्रार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर करण्यात आली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० नुसार उमेदवार जर संबंधित संस्थेचा अथवा मातृसंस्थेचा थकित कर्जदार असेल तर अशी व्यक्ती सदर पदाची निवडणूक लढविण्यास अपात्र ठरते. सदरची माहिती संबंधित उमेदवाराने चेअरमन पदाची निवडणूक लढविण्यासाठी निवडणूकिचा अर्ज सादर करताना देणे आवश्यक होते. परंतू त्यांनी सदरची माहिती लपवून ठेवून सदर निवडणूक लढविली आहे. तरी परशुराम तुकाराम निवेडकर यांना रत्नागिरी जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदावरुन तातडीने दूर करुन त्यांचे विरोधात योग्य ती कायदेशिर कारवाई करणेची विनंती करण्यात आली होती. परंतू सदर बाबत जिल्हा उपनिबंधक रत्नागिरी कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. अशी माहीती सदर पत्रात नमूद करण्यात आली आहे. या पत्रामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून यासंबंधी काही कार्यवाही होणार असा सवाल उपस्थीत केला जात आहे. परशुराम तुकाराम निवेंडकर यांनी खरोखरच कोणते कर्ज थकित ठेवले आहे का?, त्यान्नी सदरची माहीती लपवली आहे का? असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा