एसटी कर्मचाऱ्यांना थकीत वेतन आज

एसटी कर्मचाऱ्यांना थकीत वेतन आज
टाळेबंदीमुळे प्रवासावर निर्बंध आल्याने एसटी फेऱ्या आणि उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला.
महामंडळाला ५०० कोटी तातडीने वितरित
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी ५०० कोटींचा निधी तातडीने वितरित करण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर हे पैसे गुरुवारी एसटी महामंडळाच्या खात्यात जमा झाले. त्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांचा आज, शुक्र वारी पगार होईल, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी जाहीर केले. हे जुलै महिन्याचे थकीत वेतन असेल.
टाळेबंदीमुळे प्रवासावर निर्बंध आल्याने एसटी फेऱ्या आणि उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला. महसुलाअभावी एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे हाल सुरू आहेत. ही बाब लक्षात घेऊन चालू आर्थिक वर्षासाठी १४५० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी आधी दिलेले ८३८ कोटी रुपये वगळता उर्वरित ६१२ कोटींपैकी ५०० कोटी तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत, असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिला. त्यानंतर तातडीने हा निधी वितरित करण्यात आला.
एसटी महामंडळाला हा निधी मिळाल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी महामंडळाचे प्रमुख शेखर चन्ने यांना कर्मचाऱ्यांचे पगार तात्काळ करण्याचा आदेश दिला. तसेच एसटी महामंडळाला ५०० कोटी रुपये दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानत शुक्रवारीच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार होतील, अशी घोषणा परब यांनी के ली.
आर्थिक स्थिती सुधारण्यावर भर
’करोना संकटाच्या पाश्र्वाभूमीवर एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याने महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती काम करत आहे.
’समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार येणाऱ्या काळात कार्यवाही करण्यात येणार आहे.
सरकारचा मदतीचा हात याआधी राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी डिसेंबर २०२० मध्ये एक हजार कोटी रुपये दिले होते. त्यानंतर जून २०२१ मध्ये ३०० कोटी आणि जुलै २०२१ मध्ये ३०० कोटी रुपयांची मदत सरकारने महामंडळाला केली.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा